Friday 16 August 2019

🌺🌺कुस्तीपटू बजरंग पुनियाला 'खेलरत्न पुरस्कार'?🌺🌺

🔰भारताचा स्टार कुस्तीपटू बजरंग पुनियाला यावर्षीचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. हा पुरस्कार क्रीडा क्षेत्रात दिला जाणारा भारतातील सर्वोच्च पुरस्कार आहे. कुस्तीत लागोपाठ चांगले प्रदर्शन करणाऱ्या बजरंग पुनियाला यावर्षीचा राजीव गांधी खेळरत्न पुरस्कार मिळावा यासाठी भारतीय कुस्ती महासंघाकडून या प्रतिष्ठीत पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे.

🔰बजरंग पुनियासोबतच महिला कुस्तीपटू विनेश फोगाटच्या नावाची शिफारस सुद्धा करण्यात आली आहे. पुनियाने नुकतीच तबिलिसी ग्रां. प्री मध्ये सुवर्ण पदक पटकावले होते. यावेळी त्याने इराणच्या पेइमान बिबयानीचा पराभव करून ६५ किलो गटात सुवर्ण पदक पटकावले होते. भारतातील अव्वल कुस्तीपटू बजरंगने चीनमध्ये आयोजित आशियाई चॅम्पियनशीपमध्ये विजय मिळवून आशियात आपला दबदबा कायम ठेवण्यात यश मिळवले होते. बजरंगने गेल्यावर्षी आशियाई खेळात तसेच राष्ट्रकुल स्पर्धेत सुद्धा सुवर्ण पदक पटकावले होते. १२ सदस्यीय निवड समितीने पुनियाच्या नावाला पसंती दर्शवली आहे. या समितीतीत सर्व सदस्यांनी एकमताने पुनियाच्या नावावर शिक्कामोर्तब केले. या समितीत बायचूंग भूतिया, मेरी कोम यासारखी क्रीडा क्षेत्रातील नावे आहेत.

🔰१२ सदस्यीय निवड समिती खेलरत्न पुरस्कारासाठी आणखी एका आघाडीच्या क्रीडापटूचे नाव सूचवू शकते. दरम्यान, गेल्यावर्षी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि महिला वेटलिफ्टर मीराबाई चानू या दोघांना हा पुरस्कार मिळाला होता.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...