Thursday 1 August 2019

✅✅चालू घडामोडी,2 ऑगस्ट 2019✅✅

🌹🌳🌴अर्थव्यवस्था🌴🌳🌹

👉इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB) या स्वरुपात रूपांतरीत करण्याच्या निर्णय टपाल विभागाने घेतला - लघू वित्त बँक.

👉जागतिक बँकेच्या ताज्या आकडेवारीनुसार, 2018 साली भारत 2.73 लक्ष कोटी डॉलरची अर्थव्यवस्था झाली आणि आता ती जागतिक स्तरावरील या क्रमांकाची अर्थव्यवस्था म्हणून ओळखली गेली - सातवी.

🌹🌳🌴आंतरराष्ट्रीय🌴🌳🌹

👉‘QS बेस्ट स्टूडेंट सिटीज रॅंकिंग 2019’ यानुसार, विद्यार्थ्यांसाठी जगातले सर्वोत्तम शहर – लंडन(ब्रिटन).

👉पश्चिम आफ्रिकेच्या या देशात कौशल्य विकास आणि कॉटेज उद्योग प्रकल्पांना पाठिंबा म्हणून 31 जुलै रोजी भारताने 500,000 डॉलरची मदत दिली - गॅम्बिया.

👉या ठिकाणी आग्नेय आशियाई देशांचा संघ (ASEAN) परराष्ट्र मंत्री शिखर परिषद 2019 भरविण्यात आली - बँकॉक (थायलंड).

👉हा देश जुलै 2020 मध्ये मंगळ ग्रहावर अरबी जगतातले पहिले अंतराळ यान 'होप प्रोब' पाठवविणार आहे – संयुक्त अरब अमिरात (UAE).

🌹🌳🌴राष्ट्रीय🌴🌳🌹

👉‘QS बेस्ट स्टूडेंट सिटीज रॅंकिंग 2019’ यानुसार, विद्यार्थ्यांसाठी भारतातले सर्वोत्तम शहर – बेंगळुरू(जागतिक पातळीवर 81 वा).

👉31 जुलैला केंद्रीय मंत्रिमंडळाने अंतराळाचा शांततापूर्ण हेतूंसाठी वापर करण्यासाठी सहकार्यासाठी भारत आणि या देशादरम्यान झालेल्या सामंजस्य करारास मान्यता दिली - बहरीन.

👉नवी दिल्ली येथे 1 ते 4 नोव्हेंबर 2019 या काळात आयोजित केल्या जाणार्‍या ‘वर्ल्ड फूड इंडिया (WFI) 2019’ या कार्यक्रमाचा भागीदार राज्य - जम्मू वकाश्मीर.

🌹🌳🌴व्यक्ती विशेष🌴🌳🌹

👉30 जुलै रोजी अमेरिकेत निधन झालेल्या आंतरराष्ट्रीय नाणेनिधीत (IMF) भारताचे कार्यकारी संचालक असलेल्या व्यक्तीचे नाव - डॉ. सुबीर विठ्ठल गोकर्ण.

👉अर्थ मंत्रालयाचे नवे सचिव - राजीव कुमार.

👉हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (बेंगळुरू) याचे नवे संचालक (ऑपरेशन्स) – एम. एस. वेल्पारी.

🌹🌳🌴क्रिडा🌴🌳🌹

👉ICCने 2019-20 च्या हंगामासाठी नेमण्यात आलेल्या अमिराती ICC एलिट पॅनेलच्या दोन नवीन पंचांची नावे - मायकेल गफ (इंग्लंड) आणि जोएल विल्सन (वेस्ट इंडीज).

🌹🌳🌴सामान्य ज्ञान🌴🌳🌹

👉आग्नेय आशियाई राष्ट्रांचा संघ (ASEAN) याचे - स्थापना वर्ष: सन 1967; आणि मुख्यालय: जकार्ता (इंडोनेशिया).

👉आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) – स्थापना वर्ष: सन 1945; मुख्यालय: वॉशिंग्टन डी.सी. (अमेरिका).

👉आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) – स्थापना वर्ष: सन 1909; मुख्यालय: दुबई, संयुक्त अरब अमिरात (UAE).

👉गाम्बिया - राजधानी: बंजूल; राष्ट्रीय चलन: डलासी.

👉बहरीन - राजधानी: मनामा; राष्ट्रीय चलन: बहरैनी दिनार.

👉जागतिक बँक - स्थापना वर्ष: सन 1944; मुख्यालय: वॉशिंग्टन डीसी (अमेरिका).

No comments:

Post a Comment

Latest post

पठाराची स्थानिक नावे

1) गाविलगडचे पठार – अमरावती 2)  बुलढाण्याचे पठार – बुलढाणा 3) खानापूरचे पठार – सांगली 4) पाचगणीचे पठार – सातारा 5) औंधचे पठार – सातारा ...