Thursday 1 August 2019

Current affairs

⚡️लंडन: विद्यार्थ्यांसाठी जगातले सर्वोत्तम शहर

ब्रिटनमधील क्वाकलरी सायमंड्स (QS) या संस्थेकडून ‘बेस्ट स्टूडेंट सिटीज रॅंकिंग 2019’ ही नवीन जागतिक क्रमवारी जाहीर करण्यात आली आहे.

✍अहवालानुसार,

🔸ब्रिटनची राजधानी लंडन हे शहर सलग दुसर्‍या वर्षी विद्यार्थ्यांसाठी जगातले सर्वोत्तम शहर ठरले आहे.

🔸प्रथम दहा सर्वोत्तम शहरांमध्ये अनुक्रमे लंडन (ब्रिटन), टोकियो (जपान), मेलबर्न (ऑस्ट्रेलिया), म्युनिच (जर्मनी), बर्लिन (जर्मनी), मॉन्ट्रियल (कॅनडा), पॅरिस (फ्रान्स), झ्यूरिच (स्वित्झर्लंड), सिडनी (ऑस्ट्रेलिया) आणि सोल (दक्षिण कोरिया) यांचा समावेश आहे.

🔸बेंगळुरू हे विद्यार्थ्यांसाठी भारतातले सर्वोत्तम शहर ठरले आहे, जे जागतिक पातळीवर 81 या क्रमांकावर आहे. परवडण्याच्या दृष्टीने बेंगळुरू जागतिक पातळीवर सातव्या क्रमांकावर आहे. अन्य सर्वोत्तम भारतीय शहरांमध्ये मुंबई (85), दिल्ली (113) आणि चेन्नई (115) यांचा समावेश आहे.

ही यादी तयार करण्यासाठी सहा घटकांचा विचार केला गेला आहे, ज्यामध्ये विद्यार्थ्यांची शहरातली लोकसंख्या, जीवनशैलीतली गुणवत्ता, पदवी नंतर उपलब्ध नोकरीच्या संधी, परवडण्याजोगे आणि विद्यार्थ्यांचा अभिप्राय या घटकांचा समावेश आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

सहकार

   11th सहकार  :- Click Here 12th सहकार  :- Click Here