Thursday 22 August 2019

चालू घडामोडी 22/08/2019

📕 *पंतप्रधान मोदींच्या हस्ते भुटानमध्ये मांगदेछू जलविद्युत प्रकल्पाचे उद्घाटन*

● पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भुटानमध्ये उभारण्यात आलेल्या 10 हजार मेगावॉट क्षमतेच्या मांगदेछू जलविद्युत निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले.

● 4500 कोटी रूपयांचा हा जलविद्युत प्रकल्प मध्य भुटानच्या ट्रोंगासा झोंगखाग जिल्ह्यात मांगदेछू नदीवर बांधण्यात आला आहे.

●  प्रारंभी 720 मेगावॉटच्या क्षमतेसह प्रकल्प चालवला जाणार आहे.

● 2020 सालापर्यंत प्रकल्पाची पूर्ण क्षमता प्राप्त करण्याची योजना आहे.

● मांगदेछू जलविद्युत प्रकल्प हा भुटान-भारत मैत्री प्रकल्प म्हणून ओळखला जात आहे. हा भुटानमधल्या मोठ्या प्रकल्पांपैकी एक आहे.

●  हा प्रकल्प उभारण्यासाठी भारत सरकारकडून तांत्रिक आणि वित्तपुरवठा करण्यात येत आहे.

● बांधकाम खर्चाच्या 70 टक्के कर्जस्वरुपात तर 30 टक्के अनुदान अश्या स्वरुपात भारताकडून वित्तपुरवठा केला जात आहे.

● भुटान हा हिमालयाच्या पूर्व भागात असलेला बौद्ध साम्राज्य असलेला देश आहे.

●  थिंपू हे या देशाचे राजधानी शहर आहे. भारतीय रुपया, भुटानी नगुल्ट्रम ही चलने देशात वापरली जातात. झोंगखा ही देशाची अधिकृत भाषा आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

📕 *अभिनेते अशोक सराफ स्वच्छ भारत मिशनचे ब्रँड ॲम्बेसिडर* #Brand_Ambassador

● स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत संपूर्ण ग्रामीण महाराष्ट्र हागणदारीमुक्त झाला आहे.

●  ही स्वच्छता शाश्वत स्वरुपात टिकविण्यासाठी ग्रामीण भागात व्यापक प्रसिद्धीसाठी व ग्रामीण जनतेच्या वर्तन बदलासाठी ज्येष्ठ सिने अभिनेते अशोक सराफ ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून काम करणार आहेत.

● 2 ऑक्टोबर 2014 रोजी स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) या कार्यक्रमाची सुरुवात झाली.

● 2 ऑक्टोबर 2019 ऐवजी 18 एप्रिल 2018 रोजीच ग्रामीण महाराष्ट्र हागणदारीमुक्त घोषित करण्यात आला.

● 34 जिल्हे, 351 तालुके व 27 हजार 667 ग्रामपंचायती हागणदारीमुक्त घोषित केल्या. https://t.me/TargetMpscMh

● स्वच्छ भारत मिशनअंतर्गत वैयक्तिक शौचालय बांधकामासाठी यापूर्वी चार हजार रुपये इतके अनुदान देण्यात येत होते. ते आते आता बारा हजार रुपये इतके अनुदान देण्यात येते.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

📕 *राहुल आवारेची जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी निवड* #Sports

● महाराष्ट्राचा कुस्तीपटू राहुल आवारेची जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे.

● मंगळवारी या स्पर्धेसाठी पार पडलेल्या निवड चाचणी स्पर्धेत राहुलने 61 किलो वजनी गटात रवींदरचा 6-2 असा पराभव केला.

● 14 सप्टेंबरपासून कझाकस्तान येथे जागतिक अजिंक्यपद स्पर्धेला सुरुवात होणार आहे.

● ही स्पर्धा 2020च्या टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेची पात्रता मिळवण्याची पायरी आहे.
त्यामुळे राहुलकडून अनेकांच्या अपेक्षा लागल्या आहेत.

● संघटनेतील राजकारणाचा बळी पडल्यानं राहुलला 2016च्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली नाही.

●  त्यानंतर त्यानं 2018 मध्ये गोल्ड कोस्ट येथे राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक जिंकले आणि विरोधकांना चपराक लगावली.

● राहुलने राष्ट्रकुल स्पर्धेत 57 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले होते.

● आता त्यानं निवड चाचणी स्पर्धेत 61 किलो वजनी गटात बाजी मारून जागतिक स्पर्धेची पात्रताही निश्चित केली आहे.

● उपांत्य फेरीत त्यानं नवीन कुमारवर 9-4 असा मोठा विजय मिळवला होता.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

📕 *India Economic Summit 2019*

◆-  भारत आर्थिक शिखर परिषद २०१९
◆-  ठिकाण : नवी दिल्ली
◆-  कालावधी : ३-४ ऑक्टोबर २०१९
◆-  आयोजक : जागतिक आर्थिक मंच आणि भारतीय उद्योग संघ (CII )
◆-  उदघाटन : शेख हसीना (बांगलादेशच्या पंतप्रधान) आणि सानिया मिर्झा
◆-  संकल्पना : Innovating for India: Strengthening South Asia, Impacting the World’.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

📕 *बुलडाण्याच्या महिला पोलिसाचा चीनमध्ये डंका; दोन सुवर्णासह तीन पदके*

◆ चीनमध्ये झालेल्या जागतिक पोलीस क्रीडा स्पर्धेमध्ये भारतीय पोलीस दलाचे प्रतिनिधीत्व करीत असलेल्या महिला कॉन्स्टेबल मोनिका जाधव हिने तिरंदाजीमध्ये विक्रमी कामगिरी करत दोन सुवर्ण पदक व एक कांस्य पदक मिळविले. तिने 'टार्गेट आर्चरी'मध्ये ७२० पैकी ७१६ गुण मिळवित विक्रम नोंदविला.

◆ चेंगडू येथे ८ ते १८ आॅगस्ट दरम्यान या स्पर्धा झाल्या. यामध्ये मोनिकाने आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर सर्वांचे लक्ष वेधले.

◆ मोनिका या बुलडाणा पोलीस दलात कार्यरत असून आंतरराष्ट्रींय खेळाडू आहे. फिर्ल्ड आर्चरीमध्ये सुवर्ण, तर 'थ्रीडी' आर्चरी प्रकारात कांस्य पदक मिळविले.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

1 comment:

Latest post

चालू घडामोडी :- 08 मे 2024

◆ ‘जागतिक रेडक्रॉस दिन’ दरवर्षी 8 मे रोजी साजरा केला जातो. ◆ व्लादिमीर पुतिन हे पाचव्यांदा रशियाचे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत. ◆ ‘बॉर्डर रो...