Thursday 22 August 2019

प्रथम तिमाहीत भारताचा GDP वृद्धीदर 5.7% पर्यंत आणखी मंदावला आहे: नोमुरा अहवाल

✍नोमुरा या सल्लागार संस्थेच्या “कॉम्पोजिट लिडिंग इंडेक्स (CLI)” शीर्षकाच्या अहवालानुसार, कमी मागणी, कमकुवत गुंतवणूक आणि सेवा क्षेत्रातल्या कमकुवत कामगिरीमुळे चालू आर्थिक वर्षाच्या प्रथम तिमाहीत म्हणजे एप्रिल ते जून या काळात भारताचा सकल राष्ट्रीय उत्पन्न (GDP) वृद्धीदर आणखी कमी होणार असून तो 5.7 टक्क्यांवर जाणार असा अंदाज बांधण्यात आला आहे.

✍असे असूनही अर्थव्यवस्था जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत काही प्रमाणात सुधारणार अशी अपेक्षा आहे.

🔴अहवालातले ठळक मुद्दे :-

👇👇👇👇👇👇

✍जुलै महिन्यातल्या आकडेवारीत असे दिसून आले आहे की जूनमधील 31 टक्क्यांच्या तुलनेत 53 टक्के निर्देशके सुधारले आहेत.

✍जुलै ते सप्टेंबर या तिमाहीतला कॉम्पोजिट लिडिंग इंडेक्स द्वितीय तिमाहीच्या 99.8 वरून किंचित वाढीसह 99.9 वर झाला आहे. हा उच्च औद्योगिक उत्पादनातल्या वाढीचा परिणाम आहे.

✍2018-19 या आर्थिक वर्षातला भारताचा आर्थिक वाढीचा दर 6.8 टक्क्यांपर्यंत खाली आली आहे, जो 2014-15च्या तुलनेत सर्वाधिक कमी आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 08 मे 2024

◆ ‘जागतिक रेडक्रॉस दिन’ दरवर्षी 8 मे रोजी साजरा केला जातो. ◆ व्लादिमीर पुतिन हे पाचव्यांदा रशियाचे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत. ◆ ‘बॉर्डर रो...