Wednesday 21 August 2019

अभिनेते अशोक सराफ स्वच्छ भारत मिशनचे ब्रँड ॲम्बेसिडर ठरले

◼️स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत संपूर्ण ग्रामीण महाराष्ट्र हागणदारीमुक्त झाला आहे. ही स्वच्छता शाश्वत स्वरुपात टिकविण्यासाठी ग्रामीण भागात व्यापक प्रसिद्धीसाठी व ग्रामीण जनतेच्या वर्तन बदलासाठी ज्येष्ठ सिने अभिनेते अशोक सराफ ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून काम करणार आहेत.

◼️2 ऑक्टोबर 2014 रोजी स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) या कार्यक्रमाची सुरुवात झाली.

◼️2 ऑक्टोबर 2019 ऐवजी 18 एप्रिल 2018 रोजीच ग्रामीण महाराष्ट्र हागणदारीमुक्त घोषित करण्यात आला.

◼️34 जिल्हे, 351 तालुके व 27 हजार 667 ग्रामपंचायती हागणदारीमुक्त घोषित केल्या.

◼️स्वच्छ भारत मिशनअंतर्गत वैयक्तिक शौचालय बांधकामासाठी यापूर्वी चार हजार रुपये इतके अनुदान देण्यात येत होते. ते आते आता बारा हजार रुपये इतके अनुदान देण्यात येते.

No comments:

Post a Comment

Latest post

महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना (1939-1947)

🟢 1939 📌 लिनलिथगो विधान (1939)   ✦ ब्रिटन फक्त युद्धात आक्रमकतेचा प्रतिकार करत आहे   ✦ 1935 च्या कायद्यात सर्वसहमतीनंतर बदल केले जातील   ✦...