Monday 26 August 2019

बहरीनच्या तुरूंगातून 250 भारतीयांची सुटका

▪️पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नुकतेच बहरिन देशाच्या दौऱ्यावर जाऊन आले. दरम्यान, त्यांच्या या दौऱ्यातून चांगले काम झाले आहे. बहरिनच्या तुरुंगात असणाऱ्या काही भारतीय कैद्यांची सुटका करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या दौऱ्यात मोदींना बहरीनचे राजे हमाद बिन इसा बिन सलमान अल खलिफा यांच्या हस्ते 'द किंग हमाद ऑर्डर ऑफ दि रेनेसान्स' हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

▪️ भारत आणि बहरीन यांच्यातील द्विपक्षीय संबंध बळकट करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल शनिवारी मोदींचा सन्मान करण्यात आला आहे.

▪️पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बहरीन भेटीनिमित्त तिथे विविध आरोपांखाली शिक्षा भोगत असलेल्या 250 भारतीय कैद्यांना माफी देण्यात आली आहे.

▪️त्यामुळे बहरीनच्या जेलमधून 250 भारतीयांची सुटका होणार आहे. पंतप्रधान कार्यालयाच्या वतीने एक ट्‌वीट करून याबाबत माहिती देण्यात आली आहे. 'दया आणि मानवतेच्या भावनेने बहरीन सरकारने विविध आरोपांखाली शिक्षा भोगत असलेल्या 250 भारतीय कैद्यांना माफ केले आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

पठाराची स्थानिक नावे

1) गाविलगडचे पठार – अमरावती 2)  बुलढाण्याचे पठार – बुलढाणा 3) खानापूरचे पठार – सांगली 4) पाचगणीचे पठार – सातारा 5) औंधचे पठार – सातारा ...