Sunday 25 August 2019

कोमालिका बारीला जगज्जेतेपद

🏹कोमालिका बारी हिने आपल्यापेक्षा वरचढ असलेल्या जपानच्या सोनोडा वाका हिला एकतर्फी झालेल्या अंतिम फेरीत पराभूत करत रिकव्‍‌र्ह कॅडेट गटात
जगज्जेतेपदाला गवसणी घातली.

🏹भारताने जागतिक युवा तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी दुसऱ्या सुवर्णपदकाची कमाई केली.

🏹जमशेदपूर येथे जन्मलेल्या आणि टाटा तिरंदाजी अकादमीत प्रशिक्षण घेणाऱ्या कोमालिकाने सुरुवातीलाच ४-० अशी आघाडी घेतली होती.

🏹त्यानंतर ७-३ अशा फरकाने तिने अंतिम फेरीवर वर्चस्व गाजवले.

🏹 रिकव्‍‌र्ह कॅडेट (१८ वर्षांखालील) गटात १७ वर्षीय कोमालिका ही भारताची दुसरी जगज्जेती ठरली आहे.

🏹यापूर्वी दीपिका कुमारीने २००९ मध्ये जगज्जेतेपद पटकावले होते.

🏹भारतीय तिरंदाजी संघटनेवर जागतिक तिरंदाजी महासंघाने बंदी घातल्यामुळे यापुढे भारतीय तिरंदाजांना कोणत्याही आंतरराष्ट्रीय स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करता येणार नाही.

🏹मात्र या स्पर्धेत भारताने दोन सुवर्ण आणि एका कांस्यपदकाची कमाई केली.

No comments:

Post a Comment

Latest post

भारतातील महत्त्वाची पदे

📕 भारताचे सरन्यायाधीश - धनंजय चंद्रचूड 📙 भारताचे लोकपाल - ए. एम. खानविलकर 📗भारताचे महान्यायवादी - आर. वेंकट रामणी 📒 भारताचे महालेखाप...