Monday 26 August 2019

मनमोहन सिंग यांची SPG सुरक्षा काढली


📍 देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची 'SPG' सुरक्षा व्यवस्था काढून घेण्याचा केंद्र सरकारने घेतला निर्णय.

👉 सगळ्या गुप्तचर यंत्रणांकडून आढावा घेतल्यानंतर यापुढे मनमोहन सिंग 'झेड प्लस' सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला.

📝 *गृहमंत्रालयाने परिपत्रकात म्हटले* :

● सुरक्षेसंदर्भातील निर्णय पूर्णत: प्रोफेशनल आधारावर घेतला आहे.
● ठराविक काळानंतर सुरक्षाव्यवस्थेचा आढावा घेतला जातो.
● ही सामान्य प्रक्रिया आहे. याअंतर्गत सुरक्षा कमी करणे किंवा वाढवण्याचा निर्णय घेतला जातो.

🤔 *SPG सुरक्षा म्हणजे काय?* :

● SPG (स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप) ही सुरक्षा देशातील निवडक व्यक्तींनाच दिली जाते.
● देशाच्या सर्वात महत्त्वाच्या राजकारण्यांची सुरक्षा करणारे हे उच्च दर्जाचे पथक आहे.
● आता देशातील केवळ 4 जणांच्या सुरक्षेसाठी हे पथक असेल.
● यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी आणि प्रियांका गांधी वाड्रा यांचा समावेश आहे.

💫 सरकारच्या या निर्णयावरून वाद उद्भवण्याची दाट शक्यता आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना (1939-1947)

🟢 1939 📌 लिनलिथगो विधान (1939)   ✦ ब्रिटन फक्त युद्धात आक्रमकतेचा प्रतिकार करत आहे   ✦ 1935 च्या कायद्यात सर्वसहमतीनंतर बदल केले जातील   ✦...