Thursday 8 August 2019

🌹🌳भारतीय रिझर्व्ह बॅंकेचा नवा रेपो दर - 5.40%🌴🌳🌹

👉7 ऑगस्ट 2019 रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेनी (RBI) रेपो दरात 35 बेसिस पॉईंटची (0.35 टक्क्यांची) कपात करीत नवा रेपो दर 5.40 टक्के एवढा निश्चित केला.

👉RBIच्या सहा सदस्यीय वित्तीय धोरण समितीने (MPC) हा निर्णय घेतला.

👉रिव्हर्स रेपो दर 5.15 टक्के इतका करण्यात आला आहे.

👉पूर्वी रेपो दर 5.75 टक्के होता.

👉सप्टेंबर 2010 नंतरचा सर्वात कमी दर होता. त्यानंतर RBIने तीन वेळा रेपो दर 0.75 टक्के केला.

👉 रेपो दर कमी केल्यामुळे गृह, वाहन आणि अन्य कर्जे स्वस्त होण्याची शक्यता आहे.

🌹🌳🌴रेपो दर🌴🌳🌹

👉रेपो दर म्हणजे ज्या दराने बँकांना RBIकडून कर्ज दिले जाते.

👉बँका याच पैशातून ग्राहकांना कर्ज पुरवठा करत असतात.

👉रेपो दर कमी झाल्यास बँकांना मिळणारे कर्ज स्वस्त होतात.

👉अर्थातच, गृह कर्ज आणि वाहन कर्जासह इतर कर्जांवरील हप्ते स्वस्त किंवा महाग होऊ शकतात.

🌹🌳🌴रिव्हर्स रेपो दर🌴🌳🌹

👉रिव्हर्स रेपो दर म्हणजे विविध बँकांच्या RBIमध्ये जमा असलेल्या पैश्यावर बँकांना मिळणारा व्याज होय.

👉रिव्हर्स रेपो दराच्या माध्यमातून RBI बाजारपेठेतल्या कॅश लिक्विडी म्हणजेच रोखच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवू शकते.

👉बाजारात खूप रोख रक्कम असल्यास RBI रिव्हर्स दरामध्ये वाढ करत असते.

👉जेणेकरून बँका जास्त व्याज मिळविण्यासाठी स्वताःकडील जास्तीत-जास्त रोख रक्कम RBIमध्ये जमा करतील.

No comments:

Post a Comment

Latest post

महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना (1939-1947)

🟢 1939 📌 लिनलिथगो विधान (1939)   ✦ ब्रिटन फक्त युद्धात आक्रमकतेचा प्रतिकार करत आहे   ✦ 1935 च्या कायद्यात सर्वसहमतीनंतर बदल केले जातील   ✦...