Monday 26 August 2019

कर्नाटकात तीन उपमुख्यमंत्री


 
🔰 कर्नाटकात विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकूनही सत्ता स्थापन करण्याची संधी न मिळालेल्या भाजपनं एचडी कुमारस्वामी यांचं सरकार कोसळताच राज्यात सरकार स्थापन केलं आहे.

🔰 बरं सरकार स्थापन करून नुसते थांबतील तर ते मुख्यमंत्री येडियुरप्पा कसले?

🔰आपल्या सरकारचाही कार्यकाळ अल्पावधीचा ठरू नये म्हणून येडियुरप्पा यांनी अफलातून शक्कल लढवत एक-दोन नव्हे तर तीन उपमुख्यमंत्री नेमून सरकार भोवती भक्कम तटबंदी निर्माण केली आहे.

🔰एचडी कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखालील धर्मनिरपेक्ष जनता दल आणि काँग्रेस आघाडीचं सरकार कोसळताच कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी सरकार स्थापन केलं.

🔰पण कुमारस्वामी सरकारप्रमाणं आपल्याही सरकारचा कार्यकाळ अल्पावधीचा ठरू नये म्हणून त्यांनी तीन उपमुख्यमंत्री नियुक्त केले आहेत.

💢गोविंद करजोल,
💢अश्वथ नारायण आणि
💢लक्ष्मण सावदी
      यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ देण्यात आली आहे.

🔰तसेच नवनियुक्त १७ मंत्र्यांची खाती वाटप करण्यात आली आहेत. या मंत्र्यांना एक आठवड्यापूर्वीच मंत्रिपदाची शपथ देण्यात आली होती.

🔰तीन उपमुख्यमंत्र्यांपैकी गोविंद रजोल यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम आणि समाजकल्याण खातं देण्यात आलं आहे.

🔰अश्वथ नारायण यांच्याकडे उच्च शिक्षण, आयटी, औद्योगिक-विज्ञान खातं तर लक्ष्मण सावदी यांच्याकडे परिवहन खातं देण्यात आलं आहे.

🔰तर बसवराज बोम्मईंकडे गृहविभागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टार यांच्याकडे उद्योग खातं देण्यात आलं आहे.

🔰या शिवाय के. एस. ईश्वरप्पा आणि आर. अशोक या दोन्ही माजी उपमुख्यमंत्र्यांकडे क्रमश: ग्रामीण विकास, पंचायती राज आणि महसूल विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे.

🔰विशेष म्हणजे सावदी हे कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसताना त्यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

पठाराची स्थानिक नावे

1) गाविलगडचे पठार – अमरावती 2)  बुलढाण्याचे पठार – बुलढाणा 3) खानापूरचे पठार – सांगली 4) पाचगणीचे पठार – सातारा 5) औंधचे पठार – सातारा ...