Tuesday 27 August 2019

दिल्लीच्या फिरोज शाह कोटला स्टेडियमला अरुण जेटलींचं नाव


◾️नवी दिल्ली : दिल्ली क्रिकेट असोसिएशनकडून फिरोज शाह कोटला स्टेडियमला अरुण जेटलींचं नाव देण्यात येणार आहे. मंगळवारी दिल्ली क्रिकेट असोसिएशनकडून हा निर्णय घेण्यात आला. येत्या 12 सप्टेंबरला कोटला स्टेडियमच्या नामांतरणाच्या समारंभात हा कार्यक्रम पार पडेल. यावेळी गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजीजू उपस्थित राहणार आहेत.

माजी अर्थमंत्री जेटली हे 1999 ते 2012 पर्यंत दिल्ली क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष होते. त्या काळात दिल्ली क्रिकेट असोसिएशनमधल्या पायाभूत सुविधांमध्ये अमूलाग्र बदल घडवून आणण्यात जेटली यांचा मोठा वाटा होता. म्हणूनच जेटलींच्या स्मरणार्थ कोटला स्टेडियमचं नामकरण करण्याचा निर्णय डीडीसीएनं घेतला आहे.

माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांचं शनिवार 25 ऑगस्ट रोजी दिल्लीतील एम्स रुग्णालयात दिर्घ आजाराने निधन झाले. जेटली यांचं दिल्ली क्रिकेटसाठी केलेलं काम महत्त्वाचं आहे. त्यामुळेच राजकीय क्षेत्रासह क्रिडा क्षेत्रातील योगदानाबद्दल दिल्ली जिल्हा क्रिकेट असोसिएशनकडून त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. तसेच स्टेडियममधील एका स्टँडला भारतीय कर्णधार विराट कोहलीचं नाव देण्यात येण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

पठाराची स्थानिक नावे

1) गाविलगडचे पठार – अमरावती 2)  बुलढाण्याचे पठार – बुलढाणा 3) खानापूरचे पठार – सांगली 4) पाचगणीचे पठार – सातारा 5) औंधचे पठार – सातारा ...