Tuesday 27 August 2019

जाणून घ्या, झेड प्लस सुरक्षेबद्दल 'सर्वकाही'

*🔮✍️एसपीजी अर्थात स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप ही देशातील सर्वात मोठी आणि क्रमांक १ ची सुरक्षा मानली जाते. ती भेदणे अतिशय कठीण असते असेही बोलले जाते. त्यानंतर, दुसरा क्रमांक झेड प्लस आणि झेड सुरक्षाचा असा आहे. तसं, आणखी दोन प्रकारच्या सुरक्षा व्यवस्था असतात. त्या म्हणजे, एक्स (X )आणि वाय(Y) होय.*

*झेड प्लस सुरक्षा म्हणजे नेमकी काय असते..? यामध्ये किती सुरक्षा जवान असतात..?*

*देशातील सर्वात महत्वाच्या नेत्यांना, व्यक्तींना, अधिकाऱ्यांना त्यांची सुरक्षा आणखी मजबूत होण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची सुरक्षा पुरवली जाते. तसेच देशाचे पूर्व प्रधानमंत्री, देशातील महत्वाचे मंत्री, यांना साधारणपणे झेड प्लस सुरक्षा दिली जाते. या मध्ये सुरक्षेचे मजबूत कव्हर दिले जाते. हि देशातील एसपीजी नंतरची दुसऱ्या क्रमांकाची सुरक्षा व्यवस्था आहे. झेड प्लस सुरक्षा कोणाला द्यायची हे केंद्र सरकार ठरवत असते. झेड सुरक्षेमध्ये सुद्धा दोन प्रकार असतात. ते म्हणजे, एक झेड प्लस (Z Plus) आणि दूसरी झेड (Z Security) सुरक्षा. साधारणपणे केंद्रातील मोठे मंत्री आणि राज्यातील मुख्यमंत्र्यांना झेड प्लस सुरक्षा दिली जाते.*

*(उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना सुद्धा आहे झेड प्लस सुरक्षा )*

*किती प्रकारची असते सुरक्षा व्यवस्था*

*भारतात साधारणतः सुरक्षा व्यवस्था चार श्रेणीत विभागली गेली आहे. ती म्हणजे, झेड प्लस (Z+), (उच्च स्तर) झेड (Z), वाय (Y) आणि एक्स (X) श्रेणी. या चार प्रकारात कोणत्या स्तराची सुरक्षा द्यायची हे सर्वतोपरी सरकार ठरवत असते. एखाद्याला एखाद्या प्रकरचा धोका असेल तर सरकार व्ही.व्ही.आय.पी सुरक्षा देऊ शकते. पंतप्रधान, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, खासदार, आमदार, नगरसेवक, अधिकारी, माजी अधिकारी , न्यायाधीश, माजी न्यायाधीश, उद्योगपती, क्रिकेटपटू, चित्रपट कलाकार, साधू – संत अथवा नागरिक यापैकी कोणालाही हि सुरक्षा पुरवली जाऊ शकते.*

*अशी असते झेड प्लस सुरक्षेची रचना*

*झेड प्लस सुरक्षा देशातील दुसऱ्या क्रमांकाची सुरक्षा व्यवस्था आहे. त्यामध्ये एकूण ३६ सुरक्षा कर्मचारी असतात. त्यातील १० दहा जवान (National Security Guards) आणि SPG (Special Protection Group) चे कमांडो असतात. सोबतच काही पोलिसांचा समावेश असतो. या सुरक्षेमध्ये पहिल्या घेऱ्याची जबाबदारी हि एनएसजी (NSG ) ची असते. तर दुसरी एसपीजी (SPG ) कमांडोंची जबाबदारी असते. सोबतच झेड प्लस सुरक्षेमध्ये एस्कॉर्ट्स आणि पायलट वाहन सुद्धा दिलेले असते.*

*झेड प्लस सुरक्षा या लोकांना मिळते*

*उपराष्ट्रपति, माजी प्रधानमंत्री, सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, राज्यपाल, मुख्यमंत्री, महत्वाचे केंद्रीय मंत्री, प्रमुख नेते, प्रसिद्ध कलाकार,खेळाडू, देशातला एखादा प्रसिद्ध व्यक्ती किंवा नागरिक.*

*अशी असते झेड सुरक्षा*

*झेड सुरक्षेमध्ये एकूण 22 सुरक्षा कर्मचारी असतात. त्यामध्ये ५ एनएसजी कमांडो असतात. तसेच आयटीबीपी (इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलिस) आणि सीआरपीएफ च्या अधिकाऱ्यांचा सुरक्षेमध्ये समावेश असतो. या सुरक्षेमध्ये एस्कॉर्ट्स आणि पायलट वाहनेही पुरविली जातात. तसेच दिल्ली पोलिस किंवा स्थानिक पोलिसांचे सुरक्षा कर्मचारी यांचा समावेश असतो.*

*वाय सुरक्षेची रचना*

*हा सुरक्षेचा तिसरा स्तर आहे. ज्या लोकांना थोडा कमी धोका असतो. त्या लोकांना हि सुरक्षा दिली जाते. यामध्ये सर्व मिळून ११ सुरक्षा कर्मचारी असतात. ज्यामध्ये दोन कमांडोंचा समावेश असतो.*

*एक्स श्रेणी ची सुरक्षा*

*या सुरक्षा व्यवस्थेमध्ये २ सुरक्षा रक्षक असतात. ज्यामध्ये १ पीएसओ (व्यक्तिगत सुरक्षा अधिकारी) असतो. देशातील खूप लोकांना हि सुरक्षा दिली गेली आहे. या सुरक्षा व्यवस्थेमध्ये एकाही कमांडोचा समावेश नसतो.*

*या ४ ठिकाणाहून निवडले जातात या सुरक्षा व्यवस्थेतील जवान*

*१. एसपीजी (Special Protection Group)*
*२. एनएसजी (National Security Guard)*
*३. आईटीपीबी (Indo- Tibetan Border Police)*
*४. सीआरपीएफ* *(Central Reserve Police Force)*

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...