Wednesday 21 August 2019

भारताकडून सर्वाधिक 'एसओ२' उत्सर्जन

👉कोळसा जाळून सल्फर डायऑक्साइडचे (एसओ२) उत्सर्जन करणारा भारत हा जगातील सर्वांत मोठा देश असल्याचा दावा 'ग्रीनपीस' या स्वयंसेवी संस्थेने 'नासा'च्या पाहणीचा हवाला देऊन केला आहे.

👉'नासा'ने ही पाहणी केली असून, त्यासाठी ओझोन मॉनिटरिंग इन्स्ट्रुमेंट (ओएमआय)चा वापर करण्यात आला.

👉त्यात 'एसओ२'चे सर्वाधिक उत्सर्जन करणारी जगातील प्रमुख ठिकाणांची पाहणी करण्यात आली.

👉 त्यापैकी भारत हा सर्वाधिक १५ टक्के 'एसओ२'चे उत्सर्जन करत असल्याचे म्हटले असल्याचे 'ग्रीनपीस'ने म्हटले आहे.

👉भारतात मध्य प्रदेशातील सिंगरौली, तमिळनाडूतील नेवेली आणि चेन्नई, ओडिशातील तल्चेर आणि झारसुगुडा, छत्तीसगडमधील कोरबा, गुजरातेतील कच्छ, तेलंगणातील रामागुंडम आणि महाराष्ट्रातील चंद्रपूर आणि कोराडी येथे सर्वाधिक उत्सर्जन होत असल्याचे या पाहणीत आढळले.

👉हवेतील प्रदूषण कमी करण्यासाठी भारतातील बहुतेक प्रकल्पांमध्ये तंत्रज्ञानाचा अभाव असल्याचेही या पाहणीच्या विश्लेषणात आढळले.

👉जगातील सर्वाधिक 'एसओ२'चे उत्सर्जन रशियातील नोरिल्सक स्मेल्टर कॉम्प्लेक्स येथे होते.

👉त्या पाठोपाठ दक्षिण आफ्रिकेतील क्रील आणि इराणमधील झाग्रोझ या ठिकाणांचा समावेश आहे.

👉मात्र 'एसओ२'चे उत्सर्जन करणारी अधिक ठिकाणे भारतात असल्याने भारत जगात पहिल्या क्रमांकावर आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 27 मार्च 2024

◆ भारत सरकारने हिंसाचारग्रस्त हैतीमध्ये अडकलेल्या भारतीयांना शेजारच्या डोमिनिकन रिपब्लिकमध्ये स्थलांतरित करण्यासाठी 'ऑपरेशन इंद्रावती&#...