Thursday 29 August 2019

अमेरिकेत पुन्हा मंदीची भीती

✍अमेरिकेत पुढील दोन वर्षांत म्हणजे २०२० आणि २०२१मध्ये मंदीसदृश स्थिती निर्माण होण्याचा धोका आहे, असे मत एका पाहणीत दिसून आले आहे. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मात्र ही शक्यता पूर्णपणे फेटाळली आहे. अमेरिकेतील अर्थव्यवस्थेचे चित्र संमिश्र झाले असल्याचे इतरही काही अमेरिकी अहवालांमध्ये म्हटले आहे.

✍‘नॅशनल असोसिएशन फॉर बिझीनेस इकॉनॉमिस्ट’ या संस्थेने ही पाहणी केली असून तिचा अहवाल सोमवारी जाहीर झाला. या पाहणीत म्हटले आहे की, २०१८ मध्ये व्याजदरात केलेली वाढ कमी करून फेडरल रिझव्‍‌र्ह या मध्यवर्ती बँकेने ठोस संदेश दिला आहे. सध्यातरी या बँकेच्या काही उपाययोजनांमुळे मंदीसदृश स्थिती रोखली गेली आहे.

✍या वर्षीच मंदी सुरू होण्याची शक्यता २ टक्के अर्थतज्ज्ञांनी वर्तवली आहे. एनएबीईचे अध्यक्ष कॉन्सटन्स हंटर यांनी सांगितले की, पुढील वर्षीच मंदी सुरू होईल असे ३८ टक्के अर्थतज्ज्ञांना वाटते, तर ती २०२१ मध्ये सुरू होईल, अशी ३४ टक्के तज्ज्ञांची अटकळ आहे.

✍४६ टक्के अर्थतज्ज्ञांना फेडरल रिझर्वकडून आणखी एक दरकपात अपेक्षित आहे. अमेरिका आणि चीन यांच्यात नाममात्र का होईना, पण समझोता होईल आणि कोंडी फुटेल, अशी आशा ६४ टक्के अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना (1939-1947)

🟢 1939 📌 लिनलिथगो विधान (1939)   ✦ ब्रिटन फक्त युद्धात आक्रमकतेचा प्रतिकार करत आहे   ✦ 1935 च्या कायद्यात सर्वसहमतीनंतर बदल केले जातील   ✦...