Tuesday 10 September 2019

रशीद खानने केली इम्रान खानच्या विक्रमाशी बरोबरी.

बांगलादेशविरूद्ध झालेल्या एकमेव कसोटी सामन्यात अफगाणिस्तानने यजमानांवर 224 धावांनी विजय मिळवला. कसोटी संघाचा दर्जा मिळाल्यानंतर हा अफगाणिस्तानचा दुसरा विजय ठरला. या विजयासह कसोटी क्रिकेटचा दर्जा
मिळाल्यापासून सर्वात कमी कालावधीत दुसरा कसोटी विजय मिळवण्याच्या ऑस्ट्रेलियाच्या विक्रमाशी अफगाणिस्तानने बरोबरी केली.

बांगलादेश आणि अफगाणिस्तान यांच्यात झालेल्या पहिल्याच कसोटी सामन्य  अफगाणिस्तानचा संघ सरस ठरला. 398 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशला केवळ  205 धावाच करता आल्या.

कसोटी कारकिर्दीतील सर्वात तरूण कर्णधार ठरलेल्या रशीद खानने सामन्यात अर्धशतक ठोकले आणि आपल्या फिरकीच्या जाळ्यात 11 गड्यांना अडकवले.

त्यासोबत त्याने पहिल्या डावात अर्धशतकी खेळीही केली. त्याच्या या कामगिरीच्या बळावर त्याने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार अ‍ॅलन बॉर्डर आणि पाकिस्तानचा माजी कर्णधार इम्रान खान यांच्या एकाच कसोटी सामन्यात अर्धशतकी खेळी आणि 10 हून अधिक बळी टिपण्याच्या विक्रमाशी बरोबरी केली. याशिवाय, कर्णधार म्हणून
खेळताना पहिल्यावहिल्या सामन्यातच अशी कामगिरी करणारा रशीद पहिलाच खेळाडू ठरला.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...