Tuesday 10 September 2019

विक्रम लँडर सुस्थितीत.

🔰चांद्रयान 2 मधील विक्रम लँडरशी संपर्क प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरू असून आघाती अवतरणानंतर ते चंद्राच्या पृष्ठभूमीवर कोसळले असले तरी, त्याचे तुकडे झालेले नाहीत, ते सुस्थितीत आहे, असे भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) स्पष्ट केले.तसेच विक्रम लँडरमध्ये प्रज्ञान ही बग्गीसारखी गाडी आहे.

🔰चांद्रयानापासून 2 सप्टेंबरला वेगळ्या झालेल्या विक्रम लँडरला अलगदपणे चांद्रभूमीवर उतरवण्याचा प्रयोग 7 सप्टेंबरला  करण्यात आला. तो सुरुवातीला व्यवस्थित पार पडला; पण अखेरच्या टप्प्यात लँडर चांद्रभूमीपासून दोन कि.मी. उंचीवर  असताना त्याचा ‘इस्रो’च्या मुख्यालयाशी व पृथ्वीवरील भूकेंद्रांशी संपर्क तुटला. जेथे हे विक्रम लँडर उतरणे अपेक्षित होते तेथेच त्याचे आघाती अवतरण झाले, असे ‘ऑर्बिटर’ने पाठवलेल्या छायाचित्रांतून दिसत आहे. लँडरचे तुकडे झालेले नाहीत, तर ते सुस्थितीत आहे.

🔰विक्रम लँडरशी पुन्हा संपर्क प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांना यश आले तर नेमके काय घडले हे समजू शकेल. इस्रो टेलिमेट्री, ट्रॅकिंग अँड कमांड नेटवर्क (इस्ट्रॅक)च्या चमूने या अवतरणात नेमके काय चुकले असावे याचा शोध सुरू केला आहे.

🔰तसेच चांद्रयान 2 मध्ये ऑर्बिटर, लँडर (विक्रम), रोव्हर (प्रज्ञान) असे तीन भाग होते. लँडर आणि रोव्हरचा कार्यकाल एक चांद्र दिवस म्हणजे पृथ्वीवरील चौदा दिवसांइतका होता. चौदा दिवसांत लँडरशी संपर्क प्रस्थापित करणे
आवश्यक आहे, असे ‘इस्रो’चे अध्यक्ष शिवन यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...