Tuesday 10 September 2019

लाभार्थीना वाटते तोपर्यंत आरक्षण ठेवावे.

अद्याप सामाजिक आणि आर्थिक असमानता असल्यामुळे आरक्षण आवश्यक असून, जोवर त्याची गरज असल्याचे लाभार्थीना वाटते तोवर ते सुरू राहायला हवे, असे रा.स्व. संघाने सांगितले.
देशातील मंदिरे, स्मशाने आणि पाणवठे हे कुठल्याही विशिष्ट जातींपुरते मर्यादित न राहता सर्वासाठी खुले असावे असे आमच्या संघटनेला वाटते, असे संघाचे सहसरकार्यवाह दत्तात्रय होसबाळे म्हणाले.

तसेच आपल्या समाजात सामाजिक आणि आर्थिक विषमता असून त्यामुळे आरक्षण आवश्यक आहे. घटनेने अनिवार्य ठरवलेल्या आरक्षणाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे, असे संघाच्या तीन दिवसांच्या समन्वय बैठकीच्या अखेरच्या दिवशी होसबाळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

No comments:

Post a Comment

Latest post

जगाच्या भुगोलाबद्दल थोडी माहिती

➡️ जगात क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा सातवा क्रमांक लागतो. ➡️ भारताने जगाच्या एकूण क्षेत्रापैकी 2.42 टक्के क्षेत्र व्यापलेले आहे. ➡️ भार...