Sunday 29 September 2019

तृतीयपंथी मतदार नोंदणीत मुंबई उपनगर ठरले अव्वल

◾️राज्यातील एकूण ३६ जिल्ह्यांपैकी पुणे जिल्हा पुरुष आणि महिला मतदार संख्येत आघाडीवर आहे तर तृतीयपंथी मतदार नोंदणीत मुंबई उपनगर अव्वल स्थानी आहे.

◾️ राज्यातील एकूण ३६ जिल्ह्यांपैकी पुणे जिल्हा पुरुष आणि महिला मतदार संख्येत आघाडीवर आहे तर तृतीयपंथी मतदार नोंदणीत मुंबई उपनगर अव्वल स्थानी आहे.

◾️ राज्यात ३१ आॅगस्ट २०१९ पर्यंत ४ कोटी ६७ लाख ३७ हजार ८४१ पुरुष मतदार, ४ कोटी २७ लाख ५ हजार ७७७ महिला तर २ हजार ५९३ तृतीयपंथी अशा एकूण ८ कोटी ९४ लाख ४६ हजार २११ मतदारांची नोंदणी झाली आहे.

◾️तृतीयपंथी वर्गवारीमध्ये मुंबई उपनगर जिल्ह्यात एकूण ५२७ तृतीयपंथी मतदार आहेत.

◾️पुणे जिल्ह्यात एकूण ४० लाख १९ हजार ६६४ पुरुष मतदार तर ३६ लाख ६६ हजार ७४४ महिला मतदार आहेत. मुंबई उपनगर जिल्ह्यात एकूण ३९ लाख २९ हजार २३२ पुरुष मतदार तर ३२ लाख ९७ हजार ६७ महिला मतदार आहेत.

◾️ठाणे जिल्ह्यात एकूण ३४ लाख ४७ हजार १४८ पुरुष मतदार आणि २८ लाख ८१ हजार ७७७ महिला मतदार आहेत.

◾️तृतीयपंथी वर्गवारीमध्ये
📌 मुंबई उपनगर जिल्ह्यात एकूण ५२७ तृतीयपंथी मतदार,
📌ठाणे जिल्ह्यात ४६० आणि
📌पुणे जिल्ह्यात २२८ तृतीयपंथी मतदारांची नोंद करण्यात आली आहे.

◾️ लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील एकूण मतदारांमध्ये २१ लाख १५ हजार ५७५ एवढी वाढ झाली आहे.

◾️ लोकसभा निवडणुकीच्या वेळी राज्यात एकूण ८ कोटी ७३ लाख ३० हजार ४८४ मतदार होते तर आता ३१ आॅगस्टपर्यंत ८ कोटी ९४ लाख ४६ हजार २११ एवढी मतदार नोंदणी झाली आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 27 मार्च 2024

◆ भारत सरकारने हिंसाचारग्रस्त हैतीमध्ये अडकलेल्या भारतीयांना शेजारच्या डोमिनिकन रिपब्लिकमध्ये स्थलांतरित करण्यासाठी 'ऑपरेशन इंद्रावती&#...