Monday 30 September 2019

मालदीव आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा : मुंबईकर कौशल धर्मामेरने पटकावले विजेतेपद

♻️ भारताचा प्रतिभावान बॅडमिंटनपटू कौशल धर्मामेरने रविवारी मालदीव आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद मिळवले.

♻️ मुंबईच्या २३ वर्षीय कौशलने सिरिल वर्माला अवघ्या ३५ मिनिटांत २१-१३, २१-१८ अशी धूळ चारली.

♻️ कौशलव्यतिरिक्त भारताच्या तीन जोडय़ांना अंतिम फेरीत पराभवाचा धक्का सहन करावा लागला.

♻️ महिला दुहेरीत अश्विनी पोनप्पा आणि एन सिक्की रेड्डी यांना जपानच्या सायाक होबारा आणि नात्सुकी सोनी यांच्याकडून १०-२१, २१-१७, १२-२१ असा पराभव पत्करावा लागला.

♻️ मिश्र दुहेरीत थायलंडच्या चॅलेम्पोन किटामॉन आणि चायनीज कोरेपॅप यांनी भारताच्या साईप्रतीक कृष्णप्रसाद आणि अश्विनी भट्ट यांचा २१-११, २१-१५ असा धुव्वा उडवला.

♻️ पुरुष दुहेरीत अरुण जॉर्ज आणि सनम शुक्ला यांना जपानच्या अग्रमानांकित केचिरो मत्सुई आणि योशिनोरी ताकेहुची यांनी २१-९, २२-२० असे नमवले.

No comments:

Post a Comment

Latest post

महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना (1939-1947)

🟢 1939 📌 लिनलिथगो विधान (1939)   ✦ ब्रिटन फक्त युद्धात आक्रमकतेचा प्रतिकार करत आहे   ✦ 1935 च्या कायद्यात सर्वसहमतीनंतर बदल केले जातील   ✦...