Sunday 29 September 2019

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न

1) खालील विधानातील ‘उद्देश्य’ कोणते ओळखा.

     मला आपल्यासमोर चार शब्दांपेक्षा अधिक लांब भाषण करवत नाही.
   1) भाषण    2) समोर      3) अधिक    4) करवत नाही

उत्तर :- 1

2) आई वडिलांनी मुलांना मायेने वाढवावे हे ................ या प्रयोगातील वाक्य आहे.

   1) कर्मणी    2) कर्तरी      3) संकरित    4) भावे

उत्तर :- 4

3) पुढील समास कोणत्या प्रकारचा आहे ? – पुरणपोळी

   1) मध्यमपदलोपी समास      2) तत्पुरुष समास 
   3) अव्ययीभाव समास      4) व्दंव्द समास

उत्तर :- 1

4) वाक्याच्या शेवटी तपशील द्यावयाचा असल्यास कोणते विरामचिन्ह वापरतात ?

   1) अर्धविराम    2) स्वल्पविराम    3) संयोगचिन्ह    4) अपूर्णविराम

उत्तर :- 4

5) ‘ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू’
     या काव्य ओळीत कोणत्या अलंकाराचा उपयोग केला आहे ?

   1) उपमा    2) रूपक      3) उत्प्रेक्षा    4) अनन्वय

उत्तर :- 3

6) पुढीलपैकी ‘अभ्यस्त’ शब्द कोणता?

   1) दररोज    2) रात्रंदिवस    3) अभ्यास    4) यापैकी कोणताही नाही

उत्तर :- 4

7) ‘ढळला रे ढळला दिन सख्या, संध्या भिवविती हदया’ या काव्यपंक्तीतील ‘दिन ढळला’ या शब्दसमूहाचा ध्वन्यार्थ सांगा.

   1) दिवस मावळला  2) सूर्य बुडाला    3) आयुष्य संपत आले  4) दिवस संपला

उत्तर :- 3

8) खालील शब्दांपैकी विसंगत शब्द कोणता ?

   1) वाट      2) पंथ      3) रस्ता      4) पथ

उत्तर :- 2

9) ‘नैसर्गिक’ या शब्दाच्या उलट अर्थाचा शब्द निवडा.

   1) प्राकृतिक    2) स्वाभाविक    3) कृत्रिम      4) सृष्टी

उत्तर :- 3

10) ‘बादरायण संबंध असणे’ चा योग्य अर्थ निवडा.

   1) घनिष्ठ मैत्री असणे      2) दुरान्वयाने संबंध असणे
   3) ओढून ताणून संबंध  लावणे    4) शत्रूत्व असणे

उत्तर :- 3

No comments:

Post a Comment

Latest post

....𝐌𝐨𝐫𝐧𝐢𝐧𝐠 𝐁𝐨𝐨𝐬𝐭𝐞𝐫 ....

◾️2024 विस्डेन क्रिकेटर्स ऑफ द इयर रिपोर्ट प्रकाशित ◾️रिपोर्ट नुसार जगातील सर्वाधिक आघाडीचे क्रिकेटपटू ⭐️पुरुष : पॅट कमिन्स (Australia) ...