Sunday 15 September 2019

अमित पंघलची विजयी सलामी

🥊आशियाई विजेता अमित पंघलने (५२ किलो) जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत आपल्या मोहिमेची सुरुवात यशाने केली.

🥊त्याने तैपेईच्या तु पो वै याच्यावर मात करत विजयी सलामी दिली.

🥊या स्पर्धेत दुसरा मानांकित असलेल्या २३ वर्षीय अमितने प्रतिस्पर्धी वै याच्यावर ५-० अशी सरळ मात केली.

🥊 या विजयामुळे अमितने उपउपांत्यपूर्व फेरीत मजल मारली आहे. पहिल्या फेरीत त्याला पुढची चाल मिळाली होती.

🥊आक्रमक खेळाने अमितने आपल्या प्रतिस्पर्ध्यावर पहिल्या फेरीपासूनच वर्चस्व गाजविले.

🥊त्या तुलनेत पो वै याने अमितच्या आक्रमकतेला उत्तर देण्याऐवजी त्यापासून लांब पळण्याचाच पर्याय निवडला. त्यामुळे रेफ्रींनी त्याला सातत्याने तसे न करण्याचा इशारा दिला.

🥊गेल्या जागतिक स्पर्धेतही पो वै याची अमितशी झुंज झाली होती.

🥊हॅम्बर्गला झालेल्या त्या स्पर्धेतही अमितच्या आक्रमकतेपुढे पो वैने पळ काढणेच पसंत केले होते.

🥊२०१७च्या जागतिक स्पर्धेत हसनबाय दुस्मातोव्हविरुद्ध पराभूत झालेल्या अमितने यावर्षी जबरदस्त कामगिरी केली आहे.

🥊त्याने वजनी गटही बदलला आहे. आता तो ४९ किलो ऐवजी ५२ किलोत खेळत आहे.

🥊या हंगामाच्या प्रारंभीच त्याने आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत ५२ किलो वजनी गटात सुवर्ण जिंकले. त्याआधी काही महिने त्याने ५२ किलो वजनी गटात खेळणे सुरू केले होते.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 18 एप्रिल 2024

🔖 प्रश्न.1) मा. दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान तर्फे दिला जाणारा दीनानाथ मंगेशकर पुरस्कार संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल कोणाला जाहीर झा...