Monday 16 September 2019

🎻 द किंग ऑफ द ब्लूज'🎸

◾️तब्बल १५ वेळा ग्रॅमी अॅवार्ड जिंकण्याचा विक्रम करणारे प्रसिद्ध गायक, गीतकार, संगीतकार, गिटारवादक आणि 'द किंग ऑफ द ब्लूज' बी. बी. किंग यांच्या ९४ व्या जयंतीनिमित्त गुगलने खास डुडल बनवून श्रद्धांजली अर्पण केली आहे.

◾️जगाला 'ब्लूज' या संगीत शैलीची ओळख करून देणाऱ्या किंग यांच्या अनिमेटेड व्हिडिओचं गुगलने डुडल तयार केलं आहे.

◾️त्यात त्यांना त्यांची आयकॉनिक गिटार हातात घेतलेलं दाखविण्यात आलं आहे.

◾️बी. बी. किंग यांचा जन्म १६ सप्टेंबर १९२५ रोजी अमेरिकेच्या इंडोलाजवळील मिसिसिपी येथे झाला होता.

◾️ सुरुवातीच्या काळात ते रस्त्यावर गायचे. कधी कधी रात्री वस्त्यांवरही कार्यक्रम करायचे. पुढे संगीत क्षेत्रात करिअर करण्यासाठी त्यांनी मेम्फिसची वाट धरली.

◾️मेम्फिसला गेल्यावर तिथे त्यांनी त्यांच्या अनोख्या संगीताद्वारे प्रत्येक संगीतकाराला त्यांच्याकडे आकर्षित केलं. १९४८मध्ये रेडिओवर गाण्याची पहिली संधी त्यांना मिळाली आणि त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही.

◾️त्यांनी 'बील स्ट्रीट ब्लूज बॉय' नावाने रेडिओवर कार्यक्रम सादर करण्यासा सुरुवात केली. पुढे या कार्यक्रमाचं नाव 'ब्लूज बॉय किंग' असं ठेवण्यात आलं.

◾️ 'बी बी किंग' हे त्याचं शॉर्टफॉर्म नाव फेमस झालं आणि किंग यांनाही याच नावानं ओळखलं जाऊ लागलं.

◾️'द थ्रिल इज गॉन' आणि 'एव्हरी डे आय हॅव दे ब्लूज' हे त्यांचे मास्टरपीस मानले जातात. 'थ्री ओ क्लॉक्स ब्लूज' हा त्यांचा शोही प्रचंड लोकप्रिय होता.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 22 एप्रिल 2024

◆ केकी मिस्ती यांची HDFC लाइफ इन्शुरन्स बोर्डाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ◆ 6 वर्षांच्या तक्षवी वाघानीने 25 मीटरपेक्षा कमी अ...