Saturday 14 September 2019

चंद्र मोहिमांमध्ये अमेरिका २६ तर रशिया १४ वेळा अपयशी

📌चांद्रयान-२ मोहिमेतंर्गत विक्रम लँडरला चंद्रावर उतरवण्यात भले भारताला अपयश आले असेल पण त्याने निराश होण्याचे कारण नाही. कारण अवकाश इतिहासात अपयशामध्ये पुढचे यश दडलेले असते.

📌अमेरिका, रशियासारखे देश अनेक प्रयत्नांनंतर चंद्रावर पोहोचण्यात यशस्वी ठरले आहेत. मोहिमेतील विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागापासून अवघ्या २.१ किलोमीटर अंतरावर असताना मार्गावरुन भरकटले.

📌भारतचं चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करण्यात अपयशी ठरला आहे असे नाही तर अमेरिका, रशिया या देशांना देखील चांद्र मोहिमेत अनेक अडचणींचा सामना करावा लागला. सुरुवातीच्या काळात चंद्र मोहिमांमध्ये यश मिळण्याचे प्रमाण खूप कमी होते. अमेरिकेला एकूण चंद्र मोहिमांपैकी २६ वेळा तर रशियाला १४ वेळा अपयशाचा सामना करावा लागला.

📌१९५० च्या दशकात चंद्राला स्पर्श करण्याची स्पर्धा सुरु झाली. त्याकाळात अमेरिका आणि रशिया या दोन महासत्ताच त्या स्पर्धेमध्ये होत्या. १९५० च्या दशकात एकूण १४ चंद्र मोहिमा झाल्या. त्यात अमेरिकेला सात पैकी एक तर रशियाला सात पैकी तीन मोहिमांमध्ये यश मिळाले.

📌सर्वप्रथम अमेरिकेने १७ ऑगस्ट १९५८ रोजी चंद्रावर जाण्याचा प्रयत्न केला. पण पायोनिअरचे प्रक्षेपण अपयशी ठरले. १९६४ साली अमेरिकेच्या रेंजर ७ मिशनच्यावेळी पहिल्यांदा चंद्राचा जवळून फोटो काढण्यात आला. रशियाची अवकाश संस्था यूएसएसआरच्या लुना ९ मोहिमेत जानेवारी १९६६ मध्ये पहिल्यांदा चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करण्यात आले. त्यावेळी पहिल्यांदा चंद्राच्या पृष्ठभागाचा फोटो मिळाला.

📌या मिशननंतर पाच महिन्यांनी मे १९६६ मध्ये अमेरिकेने सुद्धा अशाच प्रकारची मोहिम यशस्वी केली. १९६९ साली अमेरिकेचे अपोलो ११ मिशन तर ऐतिहासिक ठरले. त्यावेळी पहिले मानवी पाऊल चंद्रावर पडले.

📌१९५८ ते १९७९ या काळात फक्त अमेरिका आणि रशियाने चंद्र मोहिमा केल्या. या २१ वर्षात दोन्ही देशांनी ९० चंद्र मोहिमा केल्या. १९८० ते ८९ या काळात चंद्रावर जाण्याची ही स्पर्धा थांबली. त्यानंतर जपान, युरोपियन युनियन, चीन, भारत आणि इस्रायलने चंद्रावर जाण्याचा प्रयत्न केला. २००९ ते २०१९ या काळात एकूण दहा चंद्र मोहिमा झाल्या.

No comments:

Post a Comment

Latest post

जगाच्या भुगोलाबद्दल थोडी माहिती

➡️ जगात क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा सातवा क्रमांक लागतो. ➡️ भारताने जगाच्या एकूण क्षेत्रापैकी 2.42 टक्के क्षेत्र व्यापलेले आहे. ➡️ भार...