▪️अत्यंत चुरशीच्या सामन्यात अथर्व अंकोलेकरने घेतलेल्या ५ बळींच्या जोरावर भारताने बांगलादेशला ५ धावांनी पराभूत करत १९ वर्षांखालील आशिया चषकाचे विजेतेपद मिळवले आहे. भारत आणि बांगलादेश या दोन्ही देशांमध्ये अखेरचा सामना कोलंबो येथे रंगला होता.
▪️आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात भारताने बांगलादेशसमोर विजयासाठी १०६ धावांचे आव्हान ठेवले होते. या सामन्यात बांगलादेश सहज विजय मिळवेल, असेच सर्वांना वाटले होते. मात्र, डावखुरा फिरकीपटू अथर्व अंकोलेकरने २८ धावांत टिपलेल्या ५ गड्यांमुळे भारताने जेतेपदावर नाव कोरले. बांगलादेशचा संपूर्ण संघ १०१ धावांवर बाद झाला. अकबर अली (२३) व मृत्यूंजय चौधरी (२१) यांचा अपवाद वगळता बांगलादेशचे अन्य फलंदाज जास्त काळ मैदानावर टिकू शकले नाही. अथर्वला आकाश सिंहने ३, तर विद्याधर पाटील व सुशांत मिश्रा यांनी प्रत्येकी एक गडी बाद करत चांगली साथ दिली.
▪️दरम्यान, १९ वर्षांखालील भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा भारताचा निर्णय चुकीचा ठरला. ८ धावांवर भारताचे ३ फलंदाज बाद झाले. कर्णधार ध्रुव जुरेलने ३३ धावा करून डाव सावरण्याचा प्रयत्न केला. शाश्वत रावतने १९ धावा करत त्याला साथ दिली. करण लालने अखेरच्या काही षटकांमध्ये फटकेबाजी केल्यामुळे भारताला शंभरी गाठता आली. करणने ३७ धावा केल्या. अखेर भारताचा संपूर्ण संघ ३२.४ षटकामध्ये १०६ धावाच करू शकला.
Sunday, 15 September 2019
बांगलादेश नमवत भारताला आशिया चषकाचे जेतेपद
Subscribe to:
Post Comments (Atom)
Latest post
सुनीता विल्यम्स पृथ्वीवर परत आल्या
◾️5 जून 2024 - ला अंतराळात गेल्या होत्या ◾️26 जून 2024 - ला परत येणार होत्या ◾️18 मार्च 2025 - ला प्रत्यक्षात परत आल्या (भारतीय वेळेनुसार 1...
-
◾️5 जून 2024 - ला अंतराळात गेल्या होत्या ◾️26 जून 2024 - ला परत येणार होत्या ◾️18 मार्च 2025 - ला प्रत्यक्षात परत आल्या (भारतीय वेळेनुसार 1...
-
1) अलीपूर कट:- 1908 🔶 बारिंद्रकुमार घोष, भूपेंद्रनाथ दत्त, खुदिराम बोस, अरविंद घोष 2) नाशिक कट:- 1910 🔶 वि दा सावरकर, अनंत कन्हेरे, बाबारा...
-
१) डोळा लागणे - झोप लागणे २) डोळा मारणे - इशारा करणे ३) डोळा चुकवणे - गुपचूप जाणे ४) डोळे येणे - नेत्रविकार होणे ५) डोळे जाणे - दृष्टी गमावण...
No comments:
Post a Comment