Sunday 15 September 2019

टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेपुढे उष्माघाताचे संकट

🅾टोक्यो : जपानमधील प्रखर उन्हाळ्याच्या मोसमात टोक्यो ऑलिम्पिक २०२० स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे ऑलिम्पिकदरम्यान खेळाडूंना तसेच चाहत्यांना उष्माघाताच्या संकटाला सामोरे जावे लागेल, असा इशारा जपानमधील एका नामांकित डॉक्टरने दिला आहे.

🅾जपान मेडिकल असोसिएशनच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य किमियुकी नानाशिमा यांनी म्हटले की, ‘‘उन्हाळ्याच्या मोसमात जपानमधील जनता बाहेर पडण्यास घाबरते, अशा वेळेला ऑलिम्पिक स्पर्धा होत असल्यामुळे जपानमधील डॉक्टरांवर खूप ताण येणार आहे. जगभरातील चाहते या स्पर्धेला हजेरी लावणार असल्यामुळे लोकांना अनेक आजारांचाही सामना करावा लागणार आहे. सुलभ वातावरणात खेळांच्या स्पर्धा आयोजित कराव्यात, असे माझे म्हणणे आहे. पण जपानमधील प्रखर उन्हाळ्यात मोकळ्या मैदानावरील स्पर्धा या चाहत्यांबरोबरच खेळाडूंसाठीही त्रासदायक ठरू शकतात.’’

🅾ऑलिम्पिक स्पर्धेच्या आयोजनाचे हक्क मिळवताना सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये २४ जुलै ते ९ ऑगस्ट हा कालावधी ऑलिम्पिक तसेच पॅरालिम्पिक खेळांसाठी योग्य असून यादरम्यान वातावरण क्रीडा स्पर्धासाठी पोषक असल्याचे म्हटले होते. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी याच कालावधीत ९३ हजार लोकांना उष्माघातामुळे अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते, त्यापैकी १५९ जणांचा मृत्यू झाला होता. उष्णतेचा त्रास टाळण्यासाठी १९६४ची टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धा ऑक्टोबर महिन्यात खेळवण्यात आली होती.

No comments:

Post a Comment

Latest post

महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना (1939-1947)

🟢 1939 📌 लिनलिथगो विधान (1939)   ✦ ब्रिटन फक्त युद्धात आक्रमकतेचा प्रतिकार करत आहे   ✦ 1935 च्या कायद्यात सर्वसहमतीनंतर बदल केले जातील   ✦...