Monday 21 October 2019

11व्या अणूऊर्जा परिषदेचे डॉ. जितेंद्र सिंग यांच्या हस्ते उद्‌घाटन

- शांततापूर्ण वापरासाठी भारताच्या अणुऊर्जेचा वापर करण्याचे होमी भाभा यांचे स्वप्न पूर्ण करु शकलो असे केंद्रीय ईशान्य प्रदेश विकास राज्यमंत्री, पंतप्रधान कार्यालय, कार्मिक सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्ती वेतन राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी म्हटले आहे. सरकारने विविध सामाजिक क्षेत्रांमध्ये अणुऊर्जेचा वैविध्यपूर्ण वापर केल्याचे त्यांनी सांगितले. ते आज नवीन दिल्लीत 11व्या अणुऊर्जा परिषदेच्या उद्‌घाटन प्रसंगी बोलत होते.

- देशात वैज्ञानिक प्रति आवड निर्माण करण्यासाठी सरकारने अनेक पावले उचलल्याचे ते म्हणाले. यापूर्वी अणुऊर्जा प्रकल्प केवळ दक्षिण भारतापर्यंतच मर्यादित होते, मात्र आता देशाच्या विविध भागांमध्ये अणु प्रकल्प सरकार स्थापन करत आहेत, असे त्यांनी सांगितले. याचा एक भाग म्हणून हरियाणातील गोरखपूर येथे अणु ऊर्जा प्रकल्प स्थापन करण्यात आले असल्याचे सांगितले.

- अणुऊर्जेच्या वापरासंबंधी जनतेमध्ये असलेले गैरसमज दूर करण्यासाठी जनजागृती करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. देशाच्या वाढत्या ऊर्जा विषयक गरजा पूर्ण करण्यासाठी अणुऊर्जा हा महत्वपूर्ण स्रोत असल्याचे त्यांनी सांगितले.

- या परिषदेत विविध संकल्पनांवर आधारीत सत्रं घेण्यात आली.

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 08 मे 2024

◆ ‘जागतिक रेडक्रॉस दिन’ दरवर्षी 8 मे रोजी साजरा केला जातो. ◆ व्लादिमीर पुतिन हे पाचव्यांदा रशियाचे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत. ◆ ‘बॉर्डर रो...