Sunday 20 October 2019

जागतिक ब्रिज स्पर्धेत भारताला प्रथमच पदक

⭐️वुहान, चीन येथे झालेल्या जागतिक ब्रिज अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या खेळाडूंनी सीनियर गटात ब्राँझपदकाची कमाई केली.

⭐️प्रथमच भारताने या स्पर्धेत पदकाची कमाई करण्याचा पराक्रम केला.

⭐️ या सीनियर गटात श्रीधरन, सुकमल दास, जितेंद्र सोलानी, दीपक पोद्दार, सुब्रत साहा आणि सुभाष धाक्रस यांचा समावेश होता.

⭐️ही ४४वी ब्रिज अजिंक्यपद स्पर्धा होती. दोन वर्षांपूर्वी भारताने उपांत्य फेरीपर्यंत धडक मारली होती.

⭐️यावेळी भारतीय संघ उपांत्य फेरीत पराभूत झाला होता, पण ब्राँझपदकाच्या झुंजीत नेदरलँड्सला हरवून त्यांनी हे पदक जिंकले.

⭐️यावेळी खुला गट, महिला गट, मिश्र गट आणि सीनियर गट अशा चार गटात भारतीय खेळाडू खेळले.

⭐️या चारही गटासाठी भारत सरकार, क्रीडा प्राधिकरणाने भारतीय खेळाडूंचा संपूर्ण खर्च केला.

No comments:

Post a Comment

Latest post

वाचा :- इतिहास प्रसिद्ध वक्तव्ये

◾️” वसाहत स्वराज्याची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी ” – भारतमंत्री मोर्ले ◾️‘सूक्ष्म अल्पसंख्यांक वर्ग’ असे कॉंग्रेसचे वर्णन – लॉर्ड डफरीन ◾️...