Monday 14 October 2019

2020 टोकियो ऑलम्पिकसाठी भारत प्रथमच ऑलम्पिक आतिथ्यगृह उघडणार

- टोकियो (जापान) या शहरात होणार्‍या ‘2020 उन्हाळी ऑलम्पिक’ स्पर्धेदरम्यान भारतीय खेळाडूंना आणि काही विशेष अतिथिंच्या सुविधेसाठी ऑलम्पिकच्या इतिहासात भारताने प्रथमच ‘इंडिया हाऊस’ या नावाने एका ऑलम्पिक आतिथ्यगृहाची स्थापना करण्याची घोषणा केली आहे.

▪️आस्थापनेबद्दल

- आरिआके या ठिकाणी उघडण्यात येणाऱ्या इंडिया हाऊसच्या जवळ चार खेळांचे आयोजन स्थळसुद्धा होणार आहे.

- JSW ग्रुप या उद्योग समूहाच्या सहकार्याने भारतीय ऑलम्पिक संघ (IOA) ही सुविधा उभारणार आहे.

- ऑलम्पिकमध्ये भाग घेणार्‍या अनेक देशांचे स्वतःचे आतिथ्यगृह आहेत, पण एखाद्या देशाने आपला सांस्कृतिक वारसा प्रदर्शित करण्याची ही पहिली वेळ ठरणार आहे. यामध्ये भारतीय संस्कृती, कला, पाककृती आणि योग प्रदर्शन या बाबींचा समावेश असणार आहे.

- इंडिया हाऊसमध्ये भारतीय पाहुणचाराबरोबरच भारतीय संघाचे ऑलम्पिकमधले प्रदर्शन आणि भारतीय संघाचा अधिकृत पोशाख याचेही प्रदर्शन घडविले
जाणार. त्याचबरोबर ऑलम्पिक पदक विजेत्या खेळाडूंचा विशेष सन्मान देखील IOA करणार आहे.

- इंडिया हाऊसमध्ये भारतीय खेळाडूंबरोबरच सर्वसामान्य लोकसुद्धा या हाऊसमध्ये येऊ शकणार आहेत. सकाळच्या सत्रात सर्वसामान्यांसाठी हे हाऊस उघडे ठेवण्यात येणार आहे. यादरम्यान योग प्रदर्शनाबरोबरच देशाने विविध खेळात केलेल्या विक्रमांचेही प्रदर्शन केले जाणार आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

हिमालयातील 8000 मी.उंचीपेक्षा जास्त उंची असणारी शिखरे..

-----------------======---------------------- शिखर               उंची(मी)             स्थान ---------------------------------------------...