Sunday 13 October 2019

कोमोरोस देशाला 20 दशलक्ष डॉलरची LoC वाढवून देण्याची घोषणा

उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू ह्यांनी 11 ऑक्टोबर 2019 रोजी कोमोरोस देशाला भेट दिली. संरक्षण आणि सागरी सहकार्य क्षेत्रात दोन्ही देशातले द्वैपक्षीय संबंध मजबूत करण्यासाठी भारताने कोमोरोसला 20 दशलक्ष डॉलर एवढी पत मर्यादा (लाइन ऑफ क्रेडिट) वाढवून देण्याची घोषणा केली.

कोमोरोस देशाचे राष्ट्रपती अझाली असौमनी यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर ही घोषणा करण्यात आली.

अन्य ठळक बाबी

✍दोन्ही देशात संरक्षण सहकार्य, शिक्षण, आरोग्य आणि संस्कृती या क्षेत्रांमध्ये विविध क्षेत्रात सहा करार झाले आहेत. एका करारानुसार भारत कोमोरोसला 2 दशलक्ष डॉलरची पतमर्यादा (LoC) देणार.

✍यावेळी उपराष्ट्रपतींना कोमोरोसचा “द ऑर्डर ऑफ ग्रीन क्रीसेंट” नावाचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला.

✍राजधानी मोरोनी येथे 18 मेगावॅट वीजनिर्मिती प्रकल्प उभारण्यासाठी भारताने 41.6 दशलक्ष डॉलरची मदत केली आहे.

✍आंतरराष्ट्रीय सौर युती कार्याचौकट करारावर (International Solar Alliance Framework Agreement) स्वाक्षरी करण्याचा कोमोरोसने निर्णय घेतला आहे.

कोमोरोस देश

कोमोरोस हा हिंद महासागरातला आफ्रिकेच्या पूर्व किनार्‍याजवळचा एक द्वीप-देश आहे. कोमोरोस आफ्रिका खंडातला तिसरा सर्वांत छोटा देश आहे. मोरोनी ही देशाची राजधानी आहे. कोमोरियन, फ्रेंच, अरबी या देशाच्या अधिकृत भाषा आहेत. कोमोरियन फ्रँक हे राष्ट्रीय चलन आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 18 एप्रिल 2024

🔖 प्रश्न.1) मा. दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान तर्फे दिला जाणारा दीनानाथ मंगेशकर पुरस्कार संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल कोणाला जाहीर झा...