06 October 2019

या' ठिकाणी चांद्रयान २ उतरलं, नासाकडून फोटो जारी

🅾वॉशिंग्टन डी.सी. : अमेरीकन अंतराळ संस्था नासाच्या 'लूनर रिकॉनिसन्स ऑर्बिटर कँमरा'द्वारे चंद्राच्या पृष्ठभागाचे काही फोटो काढले. यावेळी नासाने भारताचं चांद्रयान 2 ज्या ठिकाणी उतरलं होतं. त्या ठिकाणचे काही हाय रेजॉल्यूशनचे फोटोदेखील काढले आहेत. हे फोटो नासाने आज सकाळी जारी केले आहेत.

🅾नासाने या फोटोंसोबत चांद्रयान 2 च्या लॅण्डिंगविषयीची माहितीदेखील दिली आहे. नासाने दिलेल्या माहितीनुसार भारताचं चांद्रयान हे विक्रम लॅण्डरद्वारे सॉफ्ट लॅण्डिंग करणार होतं. परंतु चांद्रयानाने हार्ड लॅण्डिंग केलं आहे.

🅾नासाचे लूनर रिकॉनिसन्स ऑर्बिटर (एलआरओ) हे अंतराळयान 17 सप्टेंबर रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळून गेले. तेव्हा एलआरओने दक्षिण ध्रुवारील चंद्राच्या पृष्ठभागाचे काही फोटो काढले. यावेळी नासाने चांद्रयानाच्या लॅण्डिंगच्या ठिकाणाचेदेखील फोटो काढले. परंतु एलआरओ यान चांद्रयान किंवा विक्रम लॅण्डरचे सध्याचे स्थान शोधू शकलं नाही.

No comments:

Post a Comment

Latest post

महत्त्वाचे ऑपरेशन 2025

1. 'ऑपरेशन नादेर' :- भारतीय लष्कर जम्मू काश्मीर लपलेल्या दहशतवाद्यांना समाप्त करण्यासाठी - 2. ऑपरेशन टू प्रॉमिस ३:- इराण इस्राईल देश...