Monday 8 November 2021

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न

1) खालीलपैकी शुध्द शब्द कोणता ?

   1) निलिमा    2) नीलिमा   
   3) निलीमा    4) नीलीमा

उत्तर :- 2

2) मराठीत एकूण स्वर किती आहेत ?

   1) आठ    2) दहा     
  3) बारा      4) चौदा

उत्तर :- 3

3) ‘वाक्यातील विराम बदलला की वाक्याचा अर्थ बदलतो’ यास काय म्हणतात ?

   1) बलाघात    2) सीमासंधी   
  3) सुरवली    4) व्यंजनव्दित्त

उत्तर :- 2

4) पुढीलपैकी कोणत्या नामांना धर्मीवाचक नामे असे म्हणतात.

   अ) भाववाचक नामे  ब) विशेषनामे   
   क) सामान्यनामे    ड) पदार्थवाचक नामे
   1) फक्त अ    2) फक्त ब व क    3) वरील सर्व    4) फक्त अ व ब

उत्तर :- 2

5) ‘कोण’, ‘काय’ ही सर्वनामे खालील कोणत्या प्रकारात येतात ?

   1) प्रश्नार्थक व अनिश्चित    2) दर्शक व संबंधी
   3) पुरुषवाचक व अनिश्चित  4) दर्शक व प्रश्नार्थक

उत्तर :- 1

6) ‘पंचमुखी हनुमान’ हे कोणते विशेषण आहे ?

   1) अव्ययसाधित विशेषण      2) धातुसाधित विशेषण
   3) समासाधारित विशेषण      4) संबंधी विशेषण

उत्तर :- 3

7) ‘त्या राजाला मुकुट शोभतो’ – या वाक्यातील कर्म ओळखा.

   1) राजाला    2) मुकुट     
   3) शोभतो    4) त्या

उत्तर :- 2

8) ‘नित्य, सदा, सर्वदा, सतत, नेहमी ही कोणती क्रियाविशेषण अव्यये आहेत ते लिहा.

   1) कालदर्शक      2) सातत्यदर्शक   
   3) आवृत्ती दर्शक    4) स्थल दर्शक

उत्तर :- 2

9) वाक्यातील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार कोणता ? – ‘प्रवाशांकरिता मोनोरेल सुरू झाली.’

   1) हेतूवाचक    2) संबंधवाचक   
   3) साहचर्यवाचक    4) करणवाचक

उत्तर :- 1

10) खालीलपैकी कोणत्या वाक्यात न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय आहे. पुढीलपैकी बरोबर पर्याय निवडा.

   1) मरावे परी किर्तीरूप उरावे    2) तुला ज्ञान हवे की धन हवे
   3) एक रुपया म्हणजे शंभर रुपये    4) प्रयत्न केला तर फायदाच होईल

उत्तर :- 1

No comments:

Post a Comment

Latest post

जगाच्या भुगोलाबद्दल थोडी माहिती

➡️ जगात क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा सातवा क्रमांक लागतो. ➡️ भारताने जगाच्या एकूण क्षेत्रापैकी 2.42 टक्के क्षेत्र व्यापलेले आहे. ➡️ भार...