Monday 1 November 2021

भारताची राज्यघटना महत्त्वाचे प्रश्नसंच

१) भारतीय संविधानाच्या उद्देशिकेत शेवटी समाविष्ट केलेले शब्द कोणते ?

   अ) समाजवादी 
   आ) धर्मनिरपेक्ष
    इ) सार्वभौम 
    ई) लोकशाही  
    उ) गणराज्य
    ऊ) न्याय  
    ए) स्वातंत्र्य  
    ऐ) समानता
   ओ) बंधुता  
   औ) एकात्मता

   1) अ,  आ, औ 
   2) इ, ई, ऊ 
   3) उ, ए, ऐ  
   4) अ, इ, ओ

   उत्तर :- 1

२) भारताच्या राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेवर ............ प्रभाव दिसतो.

   अ) कॅनडाची राज्यघटना  
   ब) जपानची राज्यघटना
   क) इंग्लंडची राज्यघटना  
   ड) अमेरिकेची राज्यघटना

   1) अ व क 
   2) क व ड
   3) फक्त ड 
   4) फक्त ब

   उत्तर :- 3

३) भारतीय राज्यघटनेची उद्देशपत्रिका प्रथमत: केव्हा दुरुस्त करण्यात आली ?

    1) 1952

    2) 1966 

    3) 1976 

    4) 1986

उत्तर :- 3

४) .  उद्देशपत्रिकेत बहाल केलेल्या ‘स्वातंत्र्यांचा’ बरोबर क्रम आहे.

   1) अभिव्यक्ती, विचार, श्रध्दा, विश्वास, उपासना

   2) विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रध्दा, उपासना

   3) अभिव्यक्ती, विचार, विश्वास, उपासना, श्रध्दा

   4) विचार, अभिव्यक्ती, उपासना, विश्वास, श्रध्दा

उत्तर :- 2

५).  1976 च्या 42 व्या घटना दुरुस्तीने प्रस्ताविकेत कोणत्या नवीन शब्दांचा समावेश केला आहे ?

   अ) सार्वभौम आणि समाजवादी 

    ब) समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष

   क) श्रध्दा, उपासना आणि व्यक्तीची प्रतिष्ठा  
ड) एकता आणि एकात्मता

        वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत ?

   1) फक्त ब    2) ब आणि क 
  3) क आणि ड    4) ब आणि ड 

उत्तर :- 1

६) भारतीय संविधानाने नागरिकांना आर्थिक न्यायाची खात्री कशाव्दारे दिली ?

   1) उद्देशपत्रिका
   2) मूलभूत अधिकार
   3) मूलभूत कर्तव्ये 
   4) मार्गदर्शक तत्वे

    उत्तर :- 1

७) भारतीय राज्यघटनेची उद्देशपत्रिका ही ................. आहे.

    1) राज्यघटनेचे हदय 
    2) राज्यघटनेचा आत्मा
    3) राज्यघटनेचे डोके   
    4) यापैकी नाही

    उत्तर :- 3

८) खालीलपैकी कोणत्या न्यायालयीन निर्णयाव्दारे प्रास्ताविका ही घटनेचा भाग नाही असे प्रतिपादन करण्यात आले ?

     1) बेरुबरी खटला

     2) गोलकनाथ खटला

     3) केसवानंद भारती खटला

    4) बोम्मई विरूध्द भारताचे संघराज्य

    उत्तर :- 1

९) भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेतील ‘सार्वभौम’ या संकल्पनेतून खालीलपैकी कोणकोणता अर्थ ध्वनित होतो ?

   अ) बाह्य हस्तक्षेपाविना भारत स्वत:शी निगडीत निर्णय घेऊ शकतो व रद्द करू शकतो.

   ब) संघ आणि घटक राज्ये दोन्ही सार्वभौम आहेत.

   क) भारताचा संघ परकीय भूप्रदेश हस्तगत करू शकतो.

  ड) भारताच्या संघाकडे राष्ट्रीय भूप्रदेशात फेरफार करण्याचे अधिकार आहेत.

   1) ब, क, ड 
   2) अ, ब, क  
   3) अ, क, ड   
   4) अ, ब, ड

   उत्तर :- 3

१०) भारताच्या राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेवर ................. प्रभाव दिसतो.

   अ) उद्देशपत्रिकेत ‘बंधुभाव’ या तत्वाचा समावेश केला.

   ब) मूलभूत हक्कांव्दारे प्रतिष्ठा सुरक्षित केली आहे.

   क) हे हक्क वादयोग्य (दाद मागता येणार) आहेत.

   ड) गरजा आणि दुर्दशापासून नागरिकांना मुक्त ठेवण्यासाठी राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे समाविष्ट केली आहेत.

         वर दिलेल्या विधानांपैकी कोणते/ कोणती बरोबर आहेत ?

   1) केवळ अ  
   2) केवळ अ आणि ब
   3) केवळ अ, ब, क
   4) सर्व

    उत्तर :- 4

११) .खालील मुद्यांचा विचार करा.

   अ) भारतीय संविधानाचे तत्वज्ञान पंडित नेहरुंच्या ऐतिहासिक उद्दिष्टांच्या ठरावात अनुस्यूत होते.

   ब) हा ठराव संविधान सभेने 22 जानेवारी 1948 रोजी स्वीकृत केला.

   1) दोन्ही बरोबर आहेत    
   2) दोन्ही चूक आहेत
   3) ब बरोबर आहे  
   4) अ बरोबर आहे  

   उत्तर :-4

१२) . खालील विधाने लक्षात घ्या.

   अ) भारतीय संविधानाची उद्देशपत्रिका ही संविधानाचा भाग असून त्यामध्ये 368 व्या कलमानुसार दुरुस्ती करता येते.

   ब) भारतीय संविधानाची उद्देशपत्रिका संविधानाचा भाग नाही आणि त्यामध्ये दुरुस्ती करता येत नाही.

   क) उद्देशपत्रिका ही संविधानाचा भाग आहे आणि त्यामध्ये संविधानाच्या “मौलिक संरचनेला” धक्का न लावता दुरुस्ती करता येते.

        वरीलपैकी कोणते / ती विधान /  ने बरोबर आहे / त ?

   1) अ    
   2) अ, ब   
   3) क  
   4) अ, क

   उत्तर :- 4

१३) उद्देशपत्रिकेची खालील वर्णने आणि विव्दान यांनी जुळणी करा.

   अ) राजकीय कुंडली          i) पंडीत ठाकुरदास भार्गव

   ब) कल्याणकारी राज्याची अचंबित करणारी तत्वे    ii) एम. व्ही. पायली

   क) उत्कृष्ट गद्य – काव्य          iii) के. एम. मुन्शी

   ड) अशा प्रकारचा केलेला एक सर्वोत्तम मसुदा      iv) आचार्य जे. बी. कृपलानी

  अ  ब  क  ड

         1)  iii  iv  i  ii
         2)  i  ii  iii  iv
         3)  ii  i  iv  iii
         4)  iv  iii  ii  i

    उत्तर :- 1

१४).  राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेची वर्णने व ज्या विद्वानांनी किंवा न्यायालयांनी ती केली यांची जुळणी करा.

   अ) “घटना कर्त्यांचे मन ओळखण्याची किल्ली”      i) पंडीत ठाकुरदास भार्गव

   ब) “राज्यघटनेचा सर्वात मौल्यवान भाग”       ii) के. एम. मुन्शी

क) “राजकीय कुंडली”         iii) भारताचे सर न्यायाधीश ‘सिक्री’

   ड) “अत्यंत महत्वपूर्ण भाग”      iv) बेरुबारी संदर्भ खटला

  अ  ब  क  ड

         1)  iv  i  ii  iii
         2)  i  ii  iii  iv
         3)  iii  iv  i  ii
         4)  ii  iii  iv  i

    उत्तर :- 1

१५)  भारताच्या राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये कालांतराने काय सम्मिलित झाले ?

   अ) राष्ट्राची एकता   
   ब) राष्ट्राची अखंडता

   1) केवळ अ   
   2) केवळ ब  
   3) दोन्ही   
   4) दोन्ही प्रथम पासूनच सम्मिलित होते

   उत्तर :- 2

No comments:

Post a Comment

Latest post

काकोरी कट घटना

( काकोरी ट्रेन लुट म्हणूनही ओळखली जाते) ही ब्रिटिश वसाहतवादी शासनाविरुद्धच्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक महत्त्वपूर्ण घटना होती.  - दिना...