Wednesday 6 November 2019

सुमंत कठपलिया: इंडसइंड बँकेचे नवीन व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी

📌इंडसइंड बँक लिमिटेड याच्या संचालक मंडळाने नवीन व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून सुमंत कठपलिया यांची नेमणूक केली आहे.

📌सुमंत कठपलिया यांची निवड सध्याचे CEO रोमेश सोबती यांच्या जागेवर केली गेली आहे. या नियुक्तीचा प्रस्ताव मंजुरीसाठी भारतीय रिझर्व्ह बँकेकडे पाठविण्यात आला आहे.

📌गेल्या दशकभरापासून प्रमुखपदी असलेले रोमेश सोबती वयाचे 70 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मार्च 2020 मध्ये सेवानिवृत्त होणार आहेत.

📌सुमंत कठपलिया सध्या हिंदुजा उद्योग-समुहाचा पाठिंबा असलेल्या इंडसइंड बँकेत ग्राहक कर्ज विभागाचे प्रमुख आहेत. 55 वर्षांचे कठपलिया हे 2008 सालापासून बँकेसोबत जुळलेले आहेत.

No comments:

Post a Comment

Latest post

वाचा :- इतिहास प्रसिद्ध वक्तव्ये

◾️” वसाहत स्वराज्याची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी ” – भारतमंत्री मोर्ले ◾️‘सूक्ष्म अल्पसंख्यांक वर्ग’ असे कॉंग्रेसचे वर्णन – लॉर्ड डफरीन ◾️...