Wednesday 6 November 2019

नेमबाज दिपक कुमार टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र

📌 दोहा शहरात सुरु असलेल्या १४ व्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या दिपक कुमारने कांस्यपदकाची कमाई केली आहे. या कामगिरीसह दिपकने टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला आहे.

📌टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारा दिपक दहावा भारतीय नेमबाजपटू ठरला आहे.

📌 पात्रता फेरीत २२७.८ गुणांची कमाई करत दिपकने अंतिम ८ जणांमध्ये प्रवेश मिळवला. यानंतर पदकांच्या शर्यतीत ६२६.८ गुणांची कमाई करत दिपकने कांस्यपदकावर आपलं नाव कोरलं.

📌 २०१८ साली झालेल्या नेमबाजी विश्वचषकात दिपकने कांस्यपदकाची कमाई केली होती.

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी सराव प्रश्न    24 मे 2024

प्रश्न.1)  NS-25 मिशनच्या क्रू सदस्यांपैकी कोण पहिला भारतीय अंतराळ पर्यटक बनणार ? उत्तर – गोपी थोटाकुरा प्रश्न.2) आयपीएल मध्ये ८ हजार धाव...