Sunday 3 November 2019

महत्वपूर्ण चालू घडामोडी सराव प्रश्नावली

1) धर्म गार्डीयन – 2018 हा संयुक्त लष्करी युध्द सराव खालीलपैकी कोणत्या दोन देशांदरम्यान पार पडला.
   अ) भारत    ब) रशिया    क) जपान    ड) चीन
  1) अ, ब    2) अ, क    3) अ, ड    4) ब, ड
उत्तर :- 2

2) जागतिक स्पर्धात्मकता अहवाल 2018 नुसार खालील प्रथम पाच देशांचा अचूक क्रम निवडा.
   अ) अमेरिका, सिंगापूर, जर्मनी, स्वित्झर्लड, जपान
   ब) अमेरिका, सिंगापूर, जर्मनी, जपान, स्वित्झर्लंड
   क) अमेरिका, सिंगापूर, जपान, जर्मनी, स्वित्झर्लंड
   ड) अमेरिका, सिंगापूर, जपान, स्वित्झर्लंड, जर्मनी
  1) अ      2) ब      3) क      4) ड
उत्तर :- 1

3) खालील माहितीचा विचार करा.
   अ) ज्येष्ठ संगीतकार गीतकार यशवंत देव यांचे 30 ऑक्टोबर 2018 रोजी वयाच्या 91 व्या वर्षी निधन झाले.
   ब) त्यांचा ओंजळ हा कविता संग्रह प्रसिध्द आहे.
   क) 2012 ला त्यांना गादीमा पुरस्कार मिळाला आहे.
   ड) त्यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
  1) अ, ब, क योग्य    2) अ, क, ड योग्य   
   3) अ, ब, क, ड योग्य    4) ब, क, ड योग्य
उत्तर :- 3

4) खालील माहितीचा विचार करा.
   अ) भारतीय वंशाचे अमेरिकी भौतिकशास्त्रज्ञ प्रा. अभय अष्टेकर यांना आइनस्टाइन पुरस्कार जाहीर झाला.
   ब) गुरुत्वाकर्षण शास्त्राच्या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणा-या व्यक्तीस दरवर्षी या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.
   क) 2003 सालापासून हा पुरस्कार दिला जातो.
  1) अ, क सत्य    2) अ सत्य    3) अ, ब सत्य    4) अ, ब, क सत्य
उत्तर :- 4

5) इंदिरा गांधी शांतता पुरस्काराची सुरुवात केव्हापासून  झाली.
   1) 1985    2) 1986    3) 1988    4) 1992
उत्तर :- 2

No comments:

Post a Comment

Latest post

पठाराची स्थानिक नावे

1) गाविलगडचे पठार – अमरावती 2)  बुलढाण्याचे पठार – बुलढाणा 3) खानापूरचे पठार – सांगली 4) पाचगणीचे पठार – सातारा 5) औंधचे पठार – सातारा ...