Monday 10 February 2020

खवल्या मांजरापासून कोरोना विषाणू मानवात आला: शोध


- चीनमधल्या संशोधकांनी कोरोना विषाणूचे मूळ शोधून काढले. संशोधनात असे आढळून आले आहे की खवल्या मांजर (पांगोलिन) या दुर्मिळ वन्यप्राणीपासून हा विषाणू मानवात आला आहे. खवल्या मांजराची आशियात सर्वाधिक तस्करी होते.

- चीनमध्ये या विषाणूने आतापर्यंत 800 हून अधिक लोकांचा बळी घेतला आहे आणि हा आकडा वाढतच आहे. याचा उद्रेक वुहान शहरापासून झाला.

- संशोधनानुसार, कोरोना विषाणूचे जैविक स्वरूप हे खवल्या मांजराच्या पेशीपासून मिळविण्यात आलेल्या जैविक स्वरूपाबरोबर 99 टक्के जुळतो. खवल्या मांजराची होणारी तस्करी यासाठी कारणीभूत असल्याचा संशय आहे.

-  चीनमध्ये पारंपरिक औषधांमध्ये या प्राण्याचा वापर केला जातो. तसेच, त्यांच्या मांसाला अधिक मागणी आहे.

- 2002-03 या साली देखील अश्याच SARS विषाणूचा चीनमध्ये उद्रेक झाला होता. तेव्हा विषाणू सिव्हेट या सस्तन प्राण्यापासून मानवांमध्ये आला होता.

▪️खवल्या मांजर

- स्तनिवर्गातल्या फोलिडोटा गणाच्या मॅनिडी कुलातला हा प्राणी आहे. या कुलात मॅनिस हा एकच वंश असून त्यात सात जाती आहेत.

- त्यांपैकी काही आफ्रिकेत व काही आशियात आढळतात. मुग्यांची व वाळवीची वारूळे उकरून त्यांतल्या मुंग्या व वाळव्या ते आपल्या चिकट जिभेने टिपून खाते. जिभेने चाटून पाणी पितात.

- खवल्या मांजराच्या दोन जाती भारतात आढळतात, त्या म्हणजे - भारतीय खवल्या मांजर (मॅनिस क्रॅसिकॉडेटा) आणि चिनी खवल्या मांजर (मॅनिस पेटॅडॅक्टिला).

- भारतीय जाती हिमालयाच्या दक्षिणेस मैदानी प्रदेशात व डोंगरांच्या उतरणीवर आणि श्रीलंकेत आढळतात.

- चिनी जाती हिमालय, आसाम, नेपाळ, म्यानमार, दक्षिण चीन, हैनान आणि फॉर्मोसा या देशांमध्ये आढळतात.

No comments:

Post a Comment

Latest post

भारतातील महत्त्वाची पदे

📕 भारताचे सरन्यायाधीश - धनंजय चंद्रचूड 📙 भारताचे लोकपाल - ए. एम. खानविलकर 📗भारताचे महान्यायवादी - आर. वेंकट रामणी 📒 भारताचे महालेखाप...