Monday 10 February 2020

फेब्रुवारी महिन्यात डोनाल्ड ट्रम्प भारतात येणार

📌अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प लवकरच भारत दौऱ्यावर येणार आहेत. फेब्रुवारी महिन्यात ट्रम्प भारत भेटीवर येऊ शकतात. त्या दृष्टीने कार्यक्रमांची आखणी सुरु आहे. ट्रम्प यांच्याविरोधातील महाभियोग खटल्याची सुनावणी पुढच्या आठवडयात सुरु होऊ शकते. ट्रम्प यांच्या भारत दौऱ्याच्यावेळीच त्यांच्याविरोधात अमेरिकेत हा खटला सुरु असेल असा अंदाज आहे.

📌ट्रम्प यांच्या दौऱ्याची आखणी करण्यासाठी दोन्ही देश संपर्कात असून, सोयीच्या तारखा ठरवण्यासाठी चर्चा सुरु आहे. एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने ही माहिती दिली. ट्रम्प आणि मोदी बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेल्या द्विपक्षीय व्यापार करारासह अन्य करारांवर स्वाक्षरी करु शकतात.

📌भारताची आर्थिक विकासाची गती सध्या मंदावली असून, सीएए कायद्याविरोधात देशभरात आंदोलन सुरु आहे त्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांचा हा दौरा होत आहे. सप्टेंबर महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी ह्युस्टनमध्ये हाऊडी मोदी कार्यक्रम झाला होता.

📌डोनाल्ड ट्रम्पही या कार्यक्रमात सहभागी झाले होते. मोदी यांचा हात हातात घेऊन त्यांनी संपूर्ण स्टेडियमला फेरी मारली होती. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, मागच्यावर्षी ट्रम्प यांनी भारताचे प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाचे निमंत्रण नाकारले होते. डोनाल्ड ट्रम्प यांचा हा पहिलाच भारत दौरा असेल.

No comments:

Post a Comment

Latest post

यकृत शरीर रचना

👉यकृत उदर पोकळीच्या उजव्या-उजव्या भागामध्ये डायाफ्रामच्या खाली आणि पोट, उजवीकडे मूत्रपिंड आणि आतड्यांच्या वर स्थित आहे. 👉शकूच्या आकाराचे, ...