Monday 10 February 2020

महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांचा राजीनामा

🅾महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. आज संध्याकाळीच विजया रहाटकर यांनी त्यांचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे सादर केला. एका जनहित याचिकेवर झालेल्या सुनावणी दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांबाबत टिपण्णी केली होती. सरकार बदललं आहे.

🅾त्यामुळे विजया रहाटकर यांनी राजीनामा द्यायला हवा आणि 5 फेब्रुवारीपर्यंत राज्य सरकारने नव्या अध्यक्षांची नेमणूक करावी असाही आदेश न्यायालयाने दिला होता. हा आदेश कायद्यातील तरतुदींविरोधात असल्याने रहाटकर यांनी या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हानही दिलं होतं.

🅾मात्र आज विजया रहाटकर यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. आपण स्वतःहून राजीनामा देत असल्याचं विजया रहाटकर यांनी म्हटलं आहे. तसेच मागील साडेतीन वर्षांपासून आयोगाचे अध्यक्षपद सांभाळण्याचा बहुमान मिळाल्याबद्दल कृतज्ञताही व्यक्त केली आहे. बालकल्याण विभाग, आयोगाचे कर्मचारी या सगळ्यांचेच आभार विजया रहाटकर यांनी मानले आहेत.

No comments:

Post a Comment

Latest post

G7 बद्दल माहिती

🔖सौदीने तेल 300% महाग केले होते आणि 1973 मध्ये G7 ची स्थापना हालचाल सुरू झाली 📌 इस्रायल आणि अरब राष्ट्रांमध्ये युद्ध झाले. दरम्यान, अमेरि...