Sunday 2 February 2020

अभिमानास्पद Google, Windows पाठोपाठ आता IBM च्या CEO पदीही भारतीय कंपनीने पत्रक जारी करुन दिली माहिती- IBM CEO अरविंद कृष्णा


- जगप्रसिद्ध आयबीएमच्या (इंटरनॅशनल बिझनेस मशिन्स) विशेष कार्यकारी अधिकारीपदी (सीईओ) अरविंद कृष्णा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अनेक वर्षांपासून सीईओ असणाऱ्या व्हर्जिनिया रोमेटी यांच्याकडून अरविंद सहा एप्रिल रोजी कार्यभार स्वीकारतील. यासंदर्भात आयबीएमनेच पत्रक जारी करुन माहिती दिली आहे.

- ६२ वर्षीय रोमेटी या कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम पाहतील. ४० वर्षांपासून कंपनीच्या सेवेमध्ये असणाऱ्या रोमेटी या २०२० च्या शेवटी निवृत्त होणार असल्याचंही कंपनीने जारी केलेल्या पत्रकात नमूद करण्यात आलं आहे.

▪️कोण आहेत अरविंद कृष्णा

- ५७ वर्षीय अरविंद सध्या आयबीएमच्या क्लाऊड आणि कग्नेटीव्ह विभागाचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. क्लाऊड तंत्रज्ञान आणि डेटासंदर्भातील कामे या विभागांकडून पाहिली जातात.

- आयबीएम क्लाऊड, आयबीएम सिक्युरिटी, कग्नेटीव्ह अॅप्लिकेशन्स, आयबीएम रिसर्च अशा चार मुख्य शाखांचे नेतृत्व अरविंद करत आहेत. त्याआधी ते आयबीएमच्या सिस्टीम्स आणि टेक्नोलॉजीच्या डेव्हलपमेंट आणि निर्मिती विभागामध्ये महाव्यवस्थापक म्हणून काम पाहत होते.

- त्याआधी १९९० साली कंपनीमध्ये नियुक्ती झाल्यानंतर ते आयबीएमच्या डेटासंदर्भातील उद्योग विभागामध्ये होते. आयआयटी कानपूरमधून अरविंद यांनी पदवी पर्यंतचे शिक्षण घेतले आहे. त्यानंतर त्यांनी अमेरिकेतील इलिनॉयमधील उर्बाना चॅम्पियन विद्यापिठातून इलेक्ट्रीक इंजिनियरिंगमध्ये पीएचडीचे शिक्षण पूर्ण केले.

▪️रोमेटी यांच्याकडून कौतुक

- “सीईओपदी अरविंद यांची निवड अगदी अचूनक आहे. आमच्या कंपनीसाठी महत्वाचे तंत्रज्ञान निर्माण करण्यासाठी अरविंदचे मोलाचे योगदान आहे. आर्टीफिशियल इंटेलिजन्स, क्लाऊड, क्वॉंटम कंप्युटींग, बॅकचैन असे अनेक प्रकारचे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी त्याने योगदान दिले आहे. अरविंदकडे नेतृत्व करण्याचेही कौशल्य आहे

- . कंपनीच्या इतिहासातील सर्वात मोठ्या अॅक्वेझिशन्सचे नेतृत्व अरविंदने केले आहे. त्याची कंपनीमधील कामगिरी पाहिल्यास ती सातत्यपूर्ण तरी सतत नवीन बदल स्वीकारणारी आहे. त्याच्या याच वृत्तीचा कंपनीला फायदा झाला आहे. आयबीएमचे नेतृत्व करण्यासाठी तो योग्य आहे,” असं मत रोमेटी यांनी व्यक्त केलं आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

भारतात मुस्लिम सत्तेची स्थापना

👉 1. महंमद गझनवी :- अकराव्या शतकापासून भारतावर तुर्काची आक्रमणे होण्यास सुरुवात झाली. गझनीचा तुर्क सत्ताधीश सबक्तगीन याने भारतावर स्वार्‍या...