Tuesday 24 March 2020

बिल गेट्स मायक्रोसॉफ्टच्या संचालक पदावरून पायउतार

- बिल गेट्स यांनी मायक्रोसॉफ्टच्या संचालक मंडळाचा राजीनामा दिल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली. सामाजकार्यात स्वत:ला झोकून द्यायचे असल्याने त्यांनी राजीनामा दिल्याचे सांगितले जात आहे.
- बिल गेट्स यांना जागतिक आरोग्य आणि शिक्षण या क्षेत्रात काम करायच आहे, त्यामुळेच ते सर्व जबाबदाऱ्यांमधून मुक्त झाले आहेत. टेलीग्राम चॅनल व्हीजेएस ईस्टडी. मात्र ते मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नडेला यांच्यासोबत तांत्रिक सल्लागार म्हणून कार्यरत राहणार आहेत.

- सह-संस्थापक व तांत्रिक सल्लागार बिल गेट्स यांना आपला सर्वाधिक वेळ शिक्षण, आरोग्य आणि जागतिक विकासाला चालना देण्यासाठी द्यायचा आहे, यासाठीच ते कंपनीच्या संचालक मंडळाचा राजीनामा देत असल्याची माहिती मायक्रोसॉफ्टकडून दिली आहे.
- 1975 मध्ये पॉल अलेन यांच्यासोबत त्यांनी मायक्रोसॉफ्टची स्थापना केली होती. 2000 पर्यंत त्यांनी कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाची जबाबदारी पार पाडली होती.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...