Tuesday 24 March 2020

आजचे महत्त्वाचे प्रश्न

1)ग्रँड इथिओपियन रिनैसन्स डॅम (GERD) याच्या संदर्भात खाली दिलेल्यापैकी कोणते विधान बरोबर आहे?

1. GERD हा आफ्रिकेतला सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे आणि तो इथिओपियाच्या शेबेल नदीवर बांधण्यात आला आहे.

2. इथिओपियाच्या पूर्वेकडे लाल समुद्राचा किनारा आहे.

अचूक पर्याय निवडा.

(A) केवळ (1)
(B) केवळ (2)
(C) (1) आणि (2) दोन्ही
(D) यापैकी नाही

2)“भूमी राशी संकेतस्थळ” _ याच्या अखत्यारीत आहे.
(A) भूशास्त्र मंत्रालय
(B) रस्ते परिवहन व महामार्ग मंत्रालय.  √
(C) कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय
(D) पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालय

3)कोणत्या चक्रात ‘मेथॅनोट्रॉफिक बॅक्टेरिया’ची भूमिका आहे?
(A) कार्बन चक्र
(B) मिथेन चक्र.  √
(C) नायट्रोजन चक्र
(D) फॉस्फरस चक्र

4)जलशक्ती मंत्रालयांतर्गत असलेले गंगा आमंत्रण अभियान ____ याच्या माध्यमातून नदीचे पुनरुज्जीवन व जलसंधारण यावर लक्ष केंद्रीत करते.
(A) गंगा नदीत ओपन वॉटर राफ्टिंग आणि कायकिंग मोहीम.  √
(B) गंगा स्वच्छतेबाबत जनजागृती करणारी पथयात्रा
(C) पत्रिकांचे वितरण
(D) यापैकी नाही

5)________ यांच्या शिफारशीनुसार ‘भारतीय रिझर्व्ह बँक कायदा-1934’ द्वारे भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली.
(A) डी. गोरवाला आयोग
(B) हिल्टन-यंग आयोग.  √
(C) नरसिंह आयोग
(D) गाडगीळ आयोग

6)पार पडलेल्या 'विंग्स इंडिया 2020’ या कार्यक्रमाच्या संदर्भात पुढील विधाने विचारात घ्या:

1. 'विंग्स इंडिया’ हा कार्यक्रम नागरी उड्डयन मंत्रालय, संरक्षण मंत्रालय आणि फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (FICCI) यांनी संयुक्तपणे आयोजित केला.

2. कार्यक्रमाची “फ्लाइंग फॉर ऑल” ही संकल्पना होती.

अचूक विधान असणार पर्याय निवडा.

(A) केवळ (1)
(B) केवळ (2).  √
(C) (1) आणि (2) दोन्ही
(D) यापैकी नाही

7)_____ राज्यात ‘कौशल सतरंग योजना’ लागू करण्यात आली.
(A) मध्यप्रदेश
(B) राजस्थान
(C) उत्तरप्रदेश.  √
(D) बिहार

8)अखिल भारतीय व्यापारी महासंघाने (CAIT) कोरोना विषाणूच्या उद्रेकामुळे भारताच्या अर्थमंत्र्यांकडे त्यांच्या व्यवसायांसाठी विमा संरक्षण देण्याची मागणी केली. त्याच्या संदर्भात पुढील विधाने विचारात घ्या,

1. CAIT यांनी अतिरिक्त संरक्षण म्हणून 'कोरोन विषाणूमुळे आलेला व्यत्यय' जाहीर करण्याचा सल्ला दिला.

2. संदीप खंडेलवाल हे अखिल भारतीय व्यापारी महासंघाचे (CAIT) सरचिटणीस आहेत.

अचूक पर्याय निवडा.

(A) केवळ (1) बरोबर आहे.  √
(B) केवळ (2) बरोबर आहे
(C) (1) आणि (2) असे दोन्ही बरोबर आहेत
(D) ना (1) आणि ना (2) बरोबर आहे

9)कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनी (EPFO) ठेवींवरील व्याज दर किती टक्के कमी केले आहेत?
(A) 7 टक्के
(B) 8.5 टक्के.  √
(C) 6 टक्के
(D) 7.5 टक्के

10)भारतात कोरोना विषाणूच्या 80 पेक्षा जास्त प्रकरणांची पुष्टी झाल्यानंतर सरकारने __ म्हणून जाहीर केले.
(A) नैसर्गिक संकट
(B) सूचित संकट.  √
(C) मोठे संकट
(D) सर्वोच्च संकट

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 18 एप्रिल 2024

🔖 प्रश्न.1) मा. दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान तर्फे दिला जाणारा दीनानाथ मंगेशकर पुरस्कार संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल कोणाला जाहीर झा...