Monday 30 March 2020

विदर्भाच्या प्रशिक्षकपदी वसिम जाफर

🔰चंद्रकांत पंडीत यांनी विदर्भ क्रिकेट संघटनेचे प्रशिक्षकपद सोडले आहेत.

🔰जाफर हा विदर्भाच्या संघाचा महत्वाचा भाग आहे. पण जाफर हा ७ मार्चला निवृत्त झाला आहे. त्यामुळे आता पंडित यांच्या जागी विदर्भ संघाचा प्रशिक्षकपदी जाफरची नियुक्ती होऊ शकते, असे म्हटले जात आहे.

🔰पंडीत हे प्रशिक्षकपदी असताना विदर्भाच्या संघाने सलग दोनदा रणजी करंडक स्पर्धा जिंकत इतिहास रचला होता.

🔰यंदाच्या रणजी स्पर्धेच्या अंतिम फेरीत मात्र त्यांना पोहोचता आले नाही. पंडीत यांनी विदर्भाच्या संघाला सोडचिठ्ठी दिली आहे.

🔰आता ते मध्य प्रदेशच्या संघाचे प्रशिक्षकपद सांभाळणार आहेत.

🔴वसिम जाफर

🔰वसिम जाफर सर्व प्रकारच्या क्रिकेट मधून निवृत्त.

🔰सर्वात जास्त रणजी सामने - १५६

🔰रणजी मध्ये सर्वात जास्त धावा - १२०३८

🔰सर्वात जास्त शतके - ४०

🔰सर्वात जास्त अर्धशतके - ८९

🔰सर्वात जास्त झेल - २००

🔰वसीम जाफर 1996-97 ते 2012-13 दरम्यान 8 रणजी ट्रॉफी जिंकणाऱ्या मुंबईच्या संघात सहभागी होता. तर 2018 आणि 2019 मध्ये वसीम जाफरनं विदर्भाला रणजीचा किताब मिळवून देण्यामध्ये महत्त्वाची भूमिका साकारली होती.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 18 एप्रिल 2024

🔖 प्रश्न.1) मा. दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान तर्फे दिला जाणारा दीनानाथ मंगेशकर पुरस्कार संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल कोणाला जाहीर झा...