Monday 30 March 2020

मधमाशांचा हल्ला आणि त्यावरील उपाय

🔹महाराष्ट्रात मधमाशा चावणे common आहे. मधमाशांचा हल्ला कोणावरही होऊ शकतो. अगदी गिर्यारोहकांना/प्रस्तरारोहकांना तसेच पर्यटकांनाही मधमाशा कडाडून चावल्या आहेत.
🔹मध्यंतरी मी वर्तमान पात्रातून लाखो मधमाशांनी अंत्ययात्रेला जाणाऱ्या गावकऱ्यांवर हल्ला चढविला अन बऱ्याच जणांना हॉस्पिटल मध्ये भरती करावे लागले एवढी परिस्थिती ओढविली हे वाचनात आले. थोडक्यात मधमाशा कोणालाही चावतात.

🔹मधमाश्या का व केव्हा चवताळतात याचा मानवाला अजूनही शोध लागलेला नाही. वाऱ्यामुळे गवत उडून त्याचा पोळ्याला फटका बसला तरी मधमाश्या उठतात.
🔹 दरड कोसळली तरी मधमाशा उठतात. वातावरणातील अचानक बदलामुळेही मधमाशा चवताळतात. मग त्या आजूबाजूला फिरणाऱ्या मिळेल त्या जनावरावर/माणसांवर हल्ला करतात. गुरांच्या तोंडाला चावल्यामुळे गुरे धूम गावाकडे पळत सुटतात. प्रस्तरारोहणात बोल्टिंग करताना पोळे जवळ असेल तर त्या हमखास उठतात.

🔹मधमाशीच्या शेपटा कडील भागात असलेल्या काट्यात (sting) विष असते. केसांएवढा असणाऱ्या या काट्याचा आकार बास्तिक बाणासारखा असतो.  मधमाशीने डंख मारल्यानंतर हा काटा आपल्या शरीरात बास्तिक बाणासारखा रुतून बसतो. तिला तो काटा खेचून काढता येत नाही. शेवटी तिच्या प्रयत्नाने तो तुटतो. काटा अलग झाल्यामुळे मधमाशी काही तासात मरते.

🔹मधमाशीचे विष Acidic असते. त्यावर Alkaline चा उतारा हवा. म्हणून Liquid Ammonia ची बाटली प्रत्येक ग्रुपने बरोबर ठेवावी. ग्रुपकडे २/३ बाटल्या असणे जास्त चांगले. तसेच एक/दोन Magnifying Glass व २/३ Plucker असणे महत्वाचे.

🔹काटा काळ्या रंगाचा असतो. Magnifying Glass मधून बघून Plucker ने तो उपटावा. Plucker नसेल तर नखाच्या चिमटीत पकडून खेचावा. अथवा नखाने खरडवावा. खरडवल्यामुळे तो तुटतो व स्नायू काम करेनासे होतात. म्हणजेच कट्यातील विष काट्यातच रहाते. त्यानंतर त्या ठिकाणी Liquid Ammonia चा एक थेंब टाकावा व नखाने खरडवावे. म्हणजे Liquid आत शिरेल व विष Neutralize होईल. १५/२० मिनिटांनी दाह कमी होतो.

🔹याउलट गांधीला माशीचे विष Alkaline असते. वरीलप्रमाणे Plucker ने (गांधील माशीलाही काटा असतो) काटा काढावा व त्यावर लिंबू रसाचा एक थेंब टाकावा. त्यासाठी लिंबू कापू नये. दाभणाने लिम्बाला भोक पाडावे. (

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 14 एप्रिल 2024

◆ उद्योगपती आणि पायलट गोपी थोताकुरा हे पहिले भारतीय अवकाश पर्यटक ठरणार आहेत. ◆ विंग कमांडर राकेश शर्मा हे 1984 साली अवकाशात जाणारे पहिले भ...