Saturday 14 March 2020

General Knowledge

▪ केनियात आढळणाऱ्या जिराफच्या कोणत्या जातीत केवळ एकटाच नर जीवंत आहे?
उत्तर : पांढरा जिराफ

▪ भारत आणि अमेरिका यांची शिष्यवृत्ती असलेल्या ‘WISTEMM’ याचे पूर्ण नाव काय आहे?
उत्तर : विमेन इन सायन्स, टेक्नॉलजी, इंजिनीरिंग, मॅथेमॅटिक्स अँड मेडिसीन

▪ कोणत्या BSF प्रमुखाची मध्यप्रदेश पोलीस विभागाच्या प्रमुखपदी नेमणूक करण्यात आली?
उत्तर : व्ही. के. जोहरी

▪ भारत सरकार कोणत्या योजनेच्या अंतर्गत ‘हेल्थ बेनीफिट पॅकेज 2.0’ उपक्रम राबवित आहे?
उत्तर : आयुषमान भारत-PMJAY

▪ भारत ‘राष्ट्रकुल निधी’चे नाव कोणत्या राजकीय नेत्याच्या नावावरून ठेवण्याची योजना करीत आहे?
उत्तर : सरदार वल्लभभाई पटेल

▪ आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पूर्वसंध्येला किती महिलांना ‘नारी शक्ती’ पुरस्काराने गौरविण्यात आले?
उत्तर : 15

▪ अफगाणिस्तानच्या कोणत्या दोन राजकीय नेत्यांनी स्वत:ला अफगाणिस्तानचे राष्ट्रपती घोषित केले?
उत्तर : अशरफ घानी आणि अब्दुल्ला अब्दुल्ला

▪ उत्तरप्रदेश संरक्षण मार्गिका (UPDC) प्रकल्पामध्ये किती गुंतवणूक होण्याचा अंदाज आहे?
उत्तर : रु. 20,000 कोटी

▪ भूषण पॉवर अँड स्टील कंपनी कोणत्या पोलाद निर्मिती कंपनीकडून विकत घेतली जाणार आहे?
उत्तर : JSW स्टील

▪ पेटीएमच्या साथीने हैदराबाद मेट्रो रेल लिमिटेड ही कंपनी कोणती यंत्रणा सादर करणार आहे?
उत्तर : प्रवाश्यांसाठी QR वर आधारित असलेली तिकीट बुकिंग सिस्टम

No comments:

Post a Comment

Latest post

भारतात मुस्लिम सत्तेची स्थापना

👉 1. महंमद गझनवी :- अकराव्या शतकापासून भारतावर तुर्काची आक्रमणे होण्यास सुरुवात झाली. गझनीचा तुर्क सत्ताधीश सबक्तगीन याने भारतावर स्वार्‍या...