Friday 13 March 2020

शास्त्रीय उपकरणे व वापर

▫️स्टेथोस्कोप - हृदयाची स्पंदने वा ठोके मोजण्याकरिता.
▫️सेस्मोग्राफ - भूकंपाची तीव्रता व मूलस्थान यांची नोंद करण्याकरिता.
▫️ फोटोमीटर - प्रकाशाची तीव्रता मोजण्याकरिता.
▫️हायग्रोमीटर - हवेतील दमटपणा मोजणारे उपकरण.
▫️ हायड्रोमीटर - द्रव पदार्थाचे जडत्व मोजणारे उपकरण.
▫️ हायड्रोफोन - पाण्याखाली ध्वनीची आंदोलने मोजणारे उपकरण.
▫️ अ‍ॅमीटर - विद्युत प्रवाह मोजणारे उपकरण.
▫️ अल्टीमीटर - समुद्रसपाटीपासूनची उंची मोजण्यासाठी विमानात वापरतात.
▫️अ‍ॅनिमोमीटर - वाऱ्याचा वेग व दाब मोजण्यासाठी.
▫️ ऑडिओमीटर - ध्वनीची तीव्रता मोजण्यासाठी.
▫️बॅरोमीटर - हवेचा दाब मोजण्यासाठीचे उपकरण.
▫️बॅरोग्राफ - हवेचा दाब अखंडपणे मोजण्यासाठीचे उपकरण.
▫️मायक्रोस्कोप - सूक्ष्म वस्तू पाहण्यासाठीचे उपकरण.
▫️लॅक्टोमीटर - दुधाची सापेक्ष घनता मोजण्यासाठीचे उपकरण.
▫️ स्फिग्मोमॅनोमीटर - रक्तदाब मोजण्याचे साधन.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 18 एप्रिल 2024

🔖 प्रश्न.1) मा. दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान तर्फे दिला जाणारा दीनानाथ मंगेशकर पुरस्कार संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल कोणाला जाहीर झा...