Friday 13 March 2020

जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) करोना व्हायरसने जगात महारोगराई पसरल्याचं घोषित केलं आहे.


◾️ करोना व्हायरस जगातील १०० देशांमध्ये फोफावला आहे.

◾️ या व्हायरसमुळे आतापर्यंत जगभरात ४ हजारांहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

◾️या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) करोना व्हायरसने जगात महारोगराई पसरल्याचं घोषित केलं आहे.

◾️तसंच करोनाविरोधात संपूर्ण जगाने आता एकजुट होऊन लढावं, असं आवाहनही जागतिक आरोग्य संघटनेनं केलं आहे. भारतातील करोना रुग्णांची संख्या वाढून ६७ वर पोहोचली आहे.

◾️महाराष्ट्रात करोनाचे ११ रुग्ण आढळून आले आहेत. पुण्यानंतर, मुंबई आणि नागपूरमध्ये करोनाचे रुग्ण आढळले आहेत. याशिवास केरळमध्ये करोनाचे नवीन ८ रुग्ण आढळलेत. उत्तर प्रदेशात ९ जणांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलंय. तर दिल्ली आणि राजस्थानमध्ये १-१ असे आणखी दोन नवीन करोनाचे रुग्ण आढळलेत.

◾️१५ एप्रिलपर्यंत पर्यटकांचे व्हिसा रोखले

◾️देशातील करोनाच्या रुग्णांची संख्या वाढत चालल्याने केंद्र सरकारने आणखी खबरदारीची पावलं उचलली आहेत.

◾️चीन, इटली, इराण, दक्षिण कोरिया, फ्रान्स, स्पेन आणि जर्मनी या देशांमधून १५ फेब्रुवारीनंतर येणाऱ्या प्रवाशांना १४ दिवस स्वतंत्र कशात ठेवण्यात येणार आहे.

◾️तसंच १५ एप्रिलपर्यंत पर्यटन व्हिसाही सरकारने बंद केला आहे. हा निर्णय १३ मार्चपासून लागू होणार आहे.

 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

No comments:

Post a Comment

Latest post

पठाराची स्थानिक नावे

1) गाविलगडचे पठार – अमरावती 2)  बुलढाण्याचे पठार – बुलढाणा 3) खानापूरचे पठार – सांगली 4) पाचगणीचे पठार – सातारा 5) औंधचे पठार – सातारा ...