Friday 13 March 2020

गर्भवतींसाठी ‘यशोदा माता अंगत-पंगत योजना’


-----------------------------------------------------
● आदिवासी, दुर्गम भागांतील गर्भवतींचे आरोग्य उत्तम राहावे यासाठी महिला व बालविकास विभागाने ‘यशोदा माता अंगत-पंगत’ ही अभिनव योजना हाती घेतली आहे.

■ काय आहे योजना ■ : -

●  एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत ‘यशोदा अंगत-पंगत’ ही नाविन्यपूर्ण संकल्पना राज्यभरात राबविण्यास मान्यता देण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत गरोदर मातांनी अंगणवाडी केंद्रात एकत्र येऊन सहभोजन करावयाचे आहे.

● सहभोजनादरम्यान अंगणवाडी सेविका व आशा कार्यकर्त्या (एएनएम) गरोदर मातांना पोषण आहाराबाबतचे महत्त्व सांगणार आहेत.

●  त्याचबरोबर आरोग्य विभागामार्फत भोजनानंतर लोह आणि फॉलिक ॲसिडच्या (आयएफए) गोळ्या अंगणवाडी केंद्रातच देण्यात येणार आहे.

● राज्यातील 97 हजार अंगणवाडय़ा व 13 हजार मिनी अंगणवाडय़ांच्या माध्यमातून अंगणवाडी सेविकांच्या मदतीने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

● प्रायोगिक तत्त्वावर नांदेड जिल्हा परिषदेत राबविण्यात आलेली ही योजना आता संपूर्ण राज्यात राबविण्यात येणार आहे.
--------------------------------------------------------
  

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 22 एप्रिल 2024

◆ केकी मिस्ती यांची HDFC लाइफ इन्शुरन्स बोर्डाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ◆ 6 वर्षांच्या तक्षवी वाघानीने 25 मीटरपेक्षा कमी अ...