Friday 13 March 2020

आयुष मंत्रालयाचा ‘आयुष ग्रिड’ प्रकल्प

🔸भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने "आयुष ग्रिड" नावाचा देशव्यापी डिजिटल व्यासपीठ उभारण्यासाठी पावले उचलली आहेत, ज्याचा उद्देश रुग्णालये आणि प्रयोगशाळांसह आयुष (आयुर्वेद, योग व निसर्गोपचार, युनानी, सिद्ध, सोवा रिग्पा आणि होमिओपॅथी - AYUSH) सुविधा उपलब्ध करून देणे आणि आरोग्य सेवांच्या पारंपारिक यंत्रणेला चालना देणे हा आहे.

🔸वर्तमानात, मंत्रालयाने आयुष हॉस्पिटल इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट सिस्टम (A-HMIS), टेली-मेडिसिन, योगालोकेटर अॅप्लिकेशन, भुवन अ‍ॅप्लिकेशन, योग पोर्टल, केस रेजिस्ट्री पोर्टल इत्यादी प्रायोगिक प्रकल्प सुरू केले आहेत आणि पुढे आयुष ग्रिड प्रकल्पात या प्रकल्पांचा समावेश केला जाणार आहे.

🔸वर्ष 2023-24 पर्यंत आयुष मंत्रालयाने देशभरात 12,500 आयुष आरोग्य व निरोगी केंद्रे (AYUSH HWC) उभारण्याचा प्रस्ताव देखील ठेवला आहे. या योजनेसाठी पाच वर्षांच्या कालावधीत प्रस्तावित एकूण आर्थिक खर्च 3399.35 कोटी रुपये इतका येण्याचे अपेक्षित आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

Important Lakes in India

🔹डल झील :- जम्मू-कश्मीर 🔹वुलर झील :- जम्मू-कश्मीर 🔹बैरीनाग झील :- जम्मू-कश्मीर 🔹मानस बल झील :- जम्मू-कश्मीर 🔹नागिन झील :- जम्मू-कश...