Friday 13 March 2020

भारत: ‘हिंद महासागर आयोग’ याचा पाचवा निरीक्षक

🔸 6 मार्च 2020 रोजी भारत हिंद महासागर आयोगाचा पाचवा निरीक्षक झाला. माल्टा, चीन, युरोपीय संघ आणि फ्रेंच लोकांचा इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ ला फ्रान्कोफोनी हे आयोगाचे इतर चार निरीक्षक आहेत.

🔰 मुख्य बाबी

🔸 या आयोगाचा निरीक्षक बनल्यामुळे भारताला पश्चिम हिंद महासागरातल्या आफ्रिका खंडाच्या आग्नेय किनाऱ्यास जोडणार्‍या आपल्या योजनांचा विस्तार करण्यात मदत होणार.

🔹 हिंद-प्रशांत क्षेत्रातल्या पश्चिम भागासोबत भारताच्या हितसंबंधांचे समर्थन करणे हा या निवडी मागचा हेतू आहे. तसेच हिंद क्षेत्रातल्या प्रत्येकासाठी सुरक्षा आणि वृद्धी धोरणाचा देखील भारताला फायदा होणार.

🔰 हिंद महासागर आयोग

🔸 1982 साली मॉरीशस देशाच्या पोर्ट लुईस या शहरात हिंद महासागर आयोग (Indian Ocean Commission -IOC) याची स्थापना झाली. या समूहात मॉरीशस, मेडागास्कर, कोमोरोस, फ्रान्स आणि सेशल्स अश्या पाच आफ्रिकी हिंद महासागर राष्ट्रांचा समावेश आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

पठाराची स्थानिक नावे

1) गाविलगडचे पठार – अमरावती 2)  बुलढाण्याचे पठार – बुलढाणा 3) खानापूरचे पठार – सांगली 4) पाचगणीचे पठार – सातारा 5) औंधचे पठार – सातारा ...